Home शहर श्री चम्पक गच्च नायक तपस्वीराज परम पूज्य गुरुदेव श्री पारस मुनिजी म.सा....

श्री चम्पक गच्च नायक तपस्वीराज परम पूज्य गुरुदेव श्री पारस मुनिजी म.सा. यांच्या आशीर्वादाने आणि पर्युषण पर्वाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा रुग्णालय तरुणांकडून मोफत नाश्ता वाटप

अहमदनगर दिनांक ८ सप्टेंबर
पर्युषण पर्वाचे औचित्य साधून अहमदनगर शहरातील तरुणांकडून अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालय अडीचशे रुग्णांना पोह्याचा नाश्ता वाटप करण्यात आला जैन धर्मियांचा पवित्राचा असा पर्युषण पर्व सुरू असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच पार्श्वभूमीवर अन्नदान करून तरुणांनी वेगळा संदेश पोहोचवला आहे शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी सामाजिक भान राखत एकत्र येऊन या अन्नदानाचे आयोजन केले होते.

सुजल कटारिया, प्राजक्ता मुनोत , सार्थक थोरात , यश ओस्तवाल , प्रेम नहार, आनंद पिपाडा, सम्यक कटारिया ओम मूळे, या तरुणांनी एकत्र येत हा कार्यक्रम राबवला असून दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान या तरुणांकडून केले जाते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version