Home क्राईम दिवाळी आधीच त्या पोलिसांची मोठी दिवाळी…

दिवाळी आधीच त्या पोलिसांची मोठी दिवाळी…

अहमदनगर दि.13 सप्टेंबर

दिवाळीचे फटाकडे उडवण्या आधीच कोतवाली पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी जवळपास एक कोटीचे फटाकडे उडवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून एकीकडे केडगाव मध्ये मारामारी सुरू असताना हे चार कर्मचारी तिकडे धाव घेण्याचे सोडून नगर पुणे रोडवरील बायपास चौकात एका आलिशान हॉटेल समोर विनापरवाना बंदी असलेले फटाकडे घेऊन चाललेल्या एका ट्रकला पकडुन तो सोडण्यासाठी बर्गनिंग करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नगर शहरात चार दिवसापूर्वी केडगाव परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली मात्र ही हाणामारी सुरू असताना त्याच रोडवर हाकेच्या अंतरावर चार पोलीस कर्मचारी एका फटाकड्याचा ट्रक पकडून त्यातील बंदी असलेले फटाकडे आणि विना परवाना आणलेले फटाकडे सोडून देण्यासाठी व्यापाऱ्यांकडून तोड करण्यात चार कर्मचारी मग्न होते विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या देखेरेखी खाली ट्रकभर फटाकडे दुसऱ्या एका गाडीत भरले जात होते. यामध्ये बंदी असलेले चायना मेड फटाकडेचा भरणा होता.

ही गाडी मराठवाड्याकडे जाणार होती मात्र मध्येच टीप मिळाल्याने चार कर्मचाऱ्यांनी ही गाडी अडवून चांगलाच मलिदा खाल्ला आहे. विशेष म्हणजे ही गाडी सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरूनही चांगलेच प्रयत्न झाले असल्याची ही माहिती समोर आली आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरोपाला डावलून या कर्मचाऱ्यांनी चांगलीच मोठी तोड केली आहे याची चर्चा आता जोरात सुरू असून जवळपास एक कोटी पेक्षा जास्त बंदी असलेला फटाकड्याचा माल या गाडीमध्ये होता मात्र पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा नोंदवला नाही आणि गाडी सोडून दिली याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहित असूनही गाडी कशी सोडली गेली याबाबत आता खमंग चर्चा सुरू आहे.(क्रमशः)
वाचत रहा पुढील भागात कोणी केली कोणाविरुद्ध तक्रार

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version