Home शहर मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते महेश झोडगे यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत...

मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते महेश झोडगे यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश नागरदेवळे च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : महेश झोडगे

अहमदनगर दि.६ नोव्हेंबर :
नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश झोडगे यांचा मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सह भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दूरध्वनी वरून महेश झोडगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी  मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ. प्राध्यापक राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राम पानमळकर, राहुल पानसरे, दत्ता तापकीरे, आण्णा चौधरी, समीर लोंढे, भाऊसाहेब धाडगे, बाळासाहेब धाडगे, विजय दळवी, अमित धाडगे ,रोहित भुजबळ, राहुल गोंधळे, सागर निमसे, आयुब पठाण, मयूर पाखरे, राकेश ताठे, बापूसाहेब शिंदे, सोमनाथ धाडगे, भाकचंद तागडकर, एकनाथ जगताप, विजय भुतकर, दत्ता फुलारी, सचिन गोंधळे, लोकेश मेहतानी आदींसह नागरदेवळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ झोडगे म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे नागरदेवळ्याचे प्रलंबित विकासाचे प्रश्न सोडवून नागरदेवळेच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे नागरदेवळे हे गाव नगर शहरालगत असून झपाट्याने विकसित होणारे गाव आहे याचबरोबर नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देणार आहे  नागरदेवळेचा कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न आमच्या समोर उभा आहे याचबरोबर पाणी प्रश्न रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली गावाचा कायापलट करण्याचा प्रयत्न करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्रामविकासाची संकल्पना चांगली आहे ती पूर्ण करण्यासाठी युवकांना व ज्येष्ठांना बरोबर घेऊन काम करू देशात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे या माध्यमातून या गावचा शाश्वत विकासासाठी काम करू असे ते म्हणाले

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version