अहिल्यानगर दिनांक 8 डिसेंबर
नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली अवैद्य धंदे सुरू असून या स्पा सेंटरमुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. या आधीही याच ठिकाणी तोफखाना पोलिसांनी दोन वेळा छापा टाकून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे उघड केलं होतं. पुन्हा त्याच ठिकाणी आता स्पा सेंटरच्या नावाखाली विचित्र प्रकार सुरू असून यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत नगरसेवक आणि नागरिकांनी तक्रार करूनही तोफखाना पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता या अवैध धंद्याला अभय दिले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू असून या अनैतिक व्यवसायाला थेट कोणाचा छुपा पाठिंबा तर नाही ना ? असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. त्यामुळे आता नागरिकच रस्त्यावर उतरून हा अनैतिक व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहेत.

श्रीराम चौक आणि एकविरा चौक हे उच्चभ्रु वस्तीचे नागरिकांचे राहण्याचे ठिकाण असून आशा चुकीच्या व्यवसायामुळे परिसराची बदनामी होत असून आजूबाजूच्या नागरिकांना जास्त मोठा त्रास होत आहे.