Home क्राईम नगर औरंगाबाद महामार्गावर दोन हॉटेल परिसरात छापा टाकून चोरीच्या स्टील विक्री करणाऱ्या...

नगर औरंगाबाद महामार्गावर दोन हॉटेल परिसरात छापा टाकून चोरीच्या स्टील विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दीड कोटींचा माल हस्तगत नाशिकच्या विशेष पथकाची कामगिरी

अहमदनगर दि.२३ मे

अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर काही हॉटेल धाबे यांच्या मागील बानूस पत्रे शेड ठोकून चोरीच्या स्टीलची विक्री केली जात होती हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम हा स्टील (लोखंडी साळया) विक्रीचा व्यवसाय सुरू होता बाजार भावा पेक्षा कमी किमतीत या ठिकाणी स्टील विकत मिळत होते मात्र याची स्थानिक पोलीसांना खबर नव्हती हे विषेश.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाला या चोरीच्या स्टीलची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच पथकाने नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन ठिकाणी छापे मारून तब्बल दीड कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे .

रविवारी पहाटेच्या सुमारास विशेष पथकाने नगर-औरंगाबाद हायवे लगत हॉटेल निलकमल मधील शेजारी मोकळया जागेत आणि हॉटेल संग्राम पॅलेस शेजारी निळ्या पत्र्याच्या कंपाउंडमधील मोकळ्या जागेत छाप टाकून कारवाई केली. या ठिकाणावरून दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी राजसिंगानिया राजेश्वर सिंगानिया (वय ४२, रा. प्रयागराज, सेक्टर ऐ, बाना सिकोल लाईन, उत्तरप्रदेश, हल्ली मु. हॉटेल निलकमल शेजारी, नगर-औरंगाबाद रोड), राहुलकुमार कोलई राव (वय २९, रा. मवई गाव रतनपूर, जि. अयोध्या, उत्तरप्रदेश, हल्ली मु. हॉटेल निलकमल शेजारी), राजेश राव रामफेर (वय ३४, रा. पेपरमिल कॉलनी, निशादगंज, लखनऊ थाना, कुमारगंज, जि. अयोध्या, उत्तरप्रदेश, हल्ली मु. हॉटेल निलकमल शेजारी) हे रामभाऊ सानप (मूळ रा. पाटोदा, सध्या रा. नगर), प्रमोद छबू भांगर (वय २२), संदीप मोहन सांगळे (वय २७, दोघे रा. पाटोदा) आदिनाथ रावसाहेब आव्हाड (वय ३६, रा. पांगरमल, ता. नगर) याच्या सांगण्यावरून कामगार ऋषिकेश रामकिसन वाघ (वय २२, रा. वाघवाडी, ता. नेवासे), चेतन राजेंद्र हरपुडे (वय २२), शिवाजी नामदेव कुऱ्हाटे (वय ३०), गोरक्षनाथ आसाराम सावंत (वय २८, तिघे, रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासे), तात्याराव अशोक सपरे (वय ३५) परशुराम अशोक सपरे (वय २५, दोघे रा. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना), शैलेश ज्ञानोबा तांदळे (वय २४, रा. हिंगणी, जि. बीड) आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकातील पोलिस नाईक प्रमोद सोनू मंडलीक व पोलिस हवालदार शकील अहमद शेख यांनी दोन स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. रविवारी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version