अहमदनगर दि.१३ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील कापड बाजारामध्ये अतिक्रमण मोहीम राबवली जाते ती फक्त तोंड पाहून राबवली जात आहे अशी तक्रार काही व्यावसायिकांनी केली असून याबाबत बुधवारी राबवल्या गेलेली अतिक्रमण मोहीम ही फक्त काही ठराविक अतिक्रमण काढण्यासाठीच होती का? असा प्रश्न आता काही पथकर विक्रेत्यांनी विचारला आहे. कारण काही मोठमोठ्या व्यवसायिकांनी रस्त्यावर दुकानासमोर सिमेंट काँक्रीटचे अतिक्रमण केले आहेत. मात्र त्या अतिक्रमांना हात न लावता गोरगरीब छोट्या पथकर विक्रेत्यांच्या गाड्या उचलून नेण्याचा प्रताप महानगरपालिकेने केला आहे.
हातावर पोट असणाऱ्या हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण दिसते मात्र रोडवर सिमेंट काँक्रेट करणारे अतिक्रमण विभागाला दिसत नाही का? त्यांच्याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष का केले जाते. तसेच ठराविक चेहरे बघूनच अतिक्रमण मोहीम राबवली जात असल्याची याची चर्चा बाजारपेठेत होत आहे.सर्व समान सर्वांवर कारवाई केल्यास कोणाचीही तक्रार राहणार नाही. मात्र काही लोकांना या अतिक्रमणातून सुटका मिळते असा प्रश्नही आता समोर येत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी पथकर विक्रेत्यांबाबत महानगरपालिकेने सौम्य भूमिका घ्यावी आणि गोरगरिबांची दिवाळी साजरी करून द्यावी अशी मागणी पथकर विक्रेत्यांनी केली आहे.