अहमदनगर: दि.१३ ऑक्टोबर
सन २०२०-२०२१ सालात कोरोना महामारीमध्ये कोविड प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये कार्यरत असतांना
मृत्युमुखी पडलेल्या अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई
मिळणेबाबतचे एकुण १९ प्रस्तावांपैकी १४ कर्मचाऱ्यांचे प्रस्तावांना महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंजुरी दिलेली
आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे वारसांना सदरची नुकसान भरपाई तातडीने मिळणार आहे. यापूर्वी १९
प्रस्तावांपैकी केवळ १ कर्मचान्याच्या वारसांना सदरची नुकसान भरपाई मिळालेली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ.
अनंत लोखंडे व सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी म्हटले आहे की, सन २०२०-२०२१ सालात
जगभरामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले होते. सदर महामारीचा मुकाबला करणेकामी अहमदनगर
महानगरपालिकेमार्फत मा. शासनाचे आदेशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक मोहित राबविण्यात येऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आलेले होत्या. सदर मोहिमेमध्ये महानगरपालिकेतील एकुण सर्व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या होत्या. याकाळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये कर्तव्य महानगरपालिकेचे कर्तव्य बजावित असतांना एकुण १९ कर्मचारी कोरोना आजाराने मृत्युमुखी पडले होते. अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनने मा. पंतप्रधान यांचे गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत सदरचे १९ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना म्हणजेच कुटुंबियांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे त्यचचवेळी करुन सदरचे नुकसान भरपाई मिळणेबाबतचे प्रस्ताव मा. शासनाकडे पाठविण्यास अहमदनगर महानगरपालिकेस भाग पाडले होते. तसेच सदर मागणीचे पाठपुराव्याकामी वेळोवेळी आंदोलनेही केली होती. एवढेच नव्हे तर सदर मागणीच्या सोडवणुकीकामी महानगरपालिकेच्या मा. स्थायी समितीच्या बैठकीत घुसुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करुन मा. स्थायी समितीचे कामकाजही बंद पाडलेले होते. तसेच सदर प्रस्तावांना शासन मान्यता मिळणेकामी सातत्याने मा. शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवलेला होता. युनियनच्या वेळोवेळीच्या आंदोलनाच्या परिणामी अहमदनगर महानगरपालिका युनियनच्या मागणीनुसार नगर शहराचे विद्यमान आमदार संग्रामभैय्या जगताप, महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे, तत्कालीन आयुक्त शंकर गोरे, विद्यमान आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्री. यशवंत डांगे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करुन सदरची नुकसान भरपाई मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना मिळणेकामी वेळोवेळी सक्रिय पाठपुरावा अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनला सोबत घेऊन केलेला होता.
यापूर्वी एकुण मयत १९ महानगरपालिका कर्मचाऱ्यापैकी केवळ १ कर्मचाऱ्याचे वारसांना सदरची ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई तातडीने मिळालेली होती. परंतु उर्वरीत १८ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना सदरची नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असल्याने वरील सर्व संबंधितांनी महानगरपालिका कामगार युनियनला सोबत घेऊन सातत्याने उर्वरीत १८ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना मंजुरी मिळणेकामी मा. शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवलेला होता. त्याचेच परिणामी शासनाने उर्वरीत १८ पैकी अहमदनगर महानगरपालिकेतील १४ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचे प्रस्तावांना नुकतीच मंजुरी दिलेली असुन सदरच्या निधीस मंजुरी देऊन सदरचा निधी संबंधित विभागाकडे अधिकृतपणे वर्ग केला आहे.
त्यामुळे सदर १४ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना म्हणजेच कुटुंबियांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई तातडीने मिळणार आहे. तसेच उर्वरीत ४ मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणेबाबतचे प्रस्तावांनाही मंजुरी मिहणेकामी मा. शासनाकडे अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनमार्फत पाठपुरावा सुरू असल्याची
– माहिती अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे व सरचिटणीस कॉ.
आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष गुलाब राजाराम गाडे, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, अयुब शेख, सुर्यभान देवघडे, जितेंद्र सारसर, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, अकिल सय्यद, नंदुकुमार नेमाणे, राजेंद्र वाघमारे, राहुल साबळेसाबळे, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, बाळु व्यापारी, दत्ता फटांगरे, अमोल लहारे, राकेश गाडे, भास्कर आकुबत्तीन, सखाराम पवार, अनिल साठे यांनी दिली.