Home राजकारण सुमित संतोष वर्मा यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन श्री राजाभाऊ कोठारी (श्री विश्वेश्वर...

सुमित संतोष वर्मा यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन श्री राजाभाऊ कोठारी (श्री विश्वेश्वर स्वामी महाराज) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक ९ जानेवारी
अहिल्यानगर महानगर पालिकेच्या नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 11 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित संतोष वर्मा यांनी उमेदवारी केली असून. गेल्या महिनाभरात त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे. त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असून प्रभाग क्रमांक 11 मधील मूलभूत सुविधांची जाण असणारा युवक नेतृत्व म्हणून मतदार सुमित संतोष वर्मा यांच्याकडे पाहत आहेत.

Oplus_131072

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, तसेच एकता सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर बानेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि वाघ्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सुमित संतोष वर्मा हे अविरत काम करत आहेत. कामाच्या माध्यमातून राजकारण न करता फक्त समाजकारण डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या कामासाठी अहोरात्र सुमित वर्मा काम करत असल्यामुळे प्रभाग क्रमांक 11 च्या मतदारांसाठी त्यांनी आपल्या कामाचा कार्य अहवाल प्रसिद्ध केला असून. या कार्यअहवालाचे प्रकाशन राजाभाऊ कोठारी (श्री विश्वेश्वर स्वामी महाराज) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्य अहवाल हा जनतेसमोर ठेवण्यात आला असला तरी पुढील काळात बाजारपेठेतील आणि प्रभागातील मोठी कामे रखडलेली आहेत ती पूर्ण करण्याचा मानस यावेळी सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version