अहमदनगर दि.१ मे
नगर शहरातील आनंदऋषी नेत्रालयाच्या वाहनतळावरील जाण्यायेण्यासाठी प्रतिबंधासाठी लावलेली साखळी तोडून अनधिकृतपणे आत प्रवेश करून सुरक्षारक्षकाला अरेरावी व दमदाटी करणाऱ्या अनोळखी आठ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाहन तळावरील सुरकार सुरक्षारक्षक सुनील त्रिंबके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील त्रिंबके हे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आनंद ऋषी नेत्रालय येथे वाहनतळावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील वाहनतळावर असलेली साखळी तुटलेली दिसली यावेळी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला याबाबत विचारणा केली असता तिथे असलेल्या अनोळखी पुरुष व महिलांनी आम्ही साखळी तोडली असल्याचे म्हणत अरेरावी दमदाटी केली सुनील त्रिंबके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.