HomeUncategorizedतोफखाना पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सट्टेबाजीचा डॉन पोलीस पकडू शकत नाही...

तोफखाना पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सट्टेबाजीचा डॉन पोलीस पकडू शकत नाही का?

advertisement

अहमदनगर दि.२९ एप्रिल

अहमदनगर शहरातील सट्टेबाजीचा डॉन असलेल्या मोहनचा ठिकाणा सावेडी येथील तोफखाना पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ आहे सर्व गोष्टी माहीत असतानाही तोफखाना पोलीस या सट्टेबाजीकडे दुर्लक्ष का करतात. असा प्रश्न समोर येतोय.

अहमदनगर शहरात अनेक तरुण सट्टेबाजारच्या आहारी गेल्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत. अनेक तरुण आपले मोबाईल,गाड्या घरातील सोने सावकारांकडे गहाण ठेवून या सट्टेबाजीच्या मोहजाळात अडकले आहेत मात्र खुलेआम सट्टेबाजी सुरू असतानाही मोठं मोठ्या सट्टेबाजी करणार्यांवर कारवाई होताना दिसत नाही.याबाबत आता काही संघटनांचे कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर माहिती देणार असून जेणेकरून तरुणांचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचू शकते.

सट्टेबाजीचे जाळे अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात पसरले असून मोजकेच म्होरके सट्टेबाजी बुकिंग घेतात. ऑनलाईन गेम असल्यामुळे अनेकांच्या मोबाईल मध्ये सट्टेबाजी सुरू असते या सट्टेबाजी डॉन मोहन हा तोफखाना पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच असून त्याच्यावर पोलीस कारवाई होताना मात्र दिसत नाही संपूर्ण नगर शहराला हा डॉन माहीत असताना त्यांना मात्र हा डॉन का दिसत नाही हे विशेष आहे.

 

उद्या वाचा त्या आईचा आर्त टाहो .. ज्या आयपीएल सट्टेबाजी मुळे तिच्या मुलाने केली होती आत्महत्या

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular