Home क्राईम खुन करून कोणताही पुरावा सोडलेला नसताना सुपा पोलिसांनी तापस करून केला खुनाच्या...

खुन करून कोणताही पुरावा सोडलेला नसताना सुपा पोलिसांनी तापस करून केला खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा..आरोपीला ठोकल्या बेड्या

सुपा दि.१ जुलै: तर 

सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुपा शासकीय विश्रामगृहा जवळ 23 जून रोजी एक बेवारस मृतदेह सापडला होता या मृतदेहाच्या अंगावर काही जखमा असल्याने प्रथमदर्शनी पोलिसांनी हा खून असल्याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे तपास सुरू केला होता. मयत व्यक्तीच्या अंगावर ओळख पटवण्यासाठी कोणतीही खूण नसल्याने पोलिसांसमोर हे एक मोठे आवहान होते. मात्र सुपा पोलिसांनी हळूहळू सर्व धागेदोरे जुळवत मयत असलेल्या इसमाची माहिती मिळवली मयत व्यक्ती हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामास होता.खंडू रघुनाथ औटी असे त्याचे नाव समोर आल्यानंतर पोलीस तपासात खंडू ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्या हॉटेलमधील आणखी एक वेटर खंडू च्या गायब झाल्यानंतर तो वेटर कामावर आला नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करून फरार असलेल्या वेटर चा शोध घेतला असता तो वेटर हॉटेलमध्ये खोटे नाव सांगून वावरत होता त्याचे खरे नाव प्रविण पुंडलिक गोलाईत असे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी प्रवीण याच्या मुस्क्या अवळल्या आहेत.कोणताही पुरावा नसताना सुपे पोलिसांनी धागे जुळवत हा अवघड तपास पूर्णत्वास नेला आहे.

प्रवीण याने दारु पिऊन दारुच्या नशेत खंडू औटी याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन खुन केल्याची कबुली दिली आहे.

हा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला . अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पो.स.ई. तुकाराम पवार, पो.स.ई अख्तर पठाण, पो.हे.कॉ चंडेराव शिंदे, पो.हे.कॉ संदीप चौधरी, पो.ना यशवंत ठोंबरे, पो. ना संदीप पवार यांनी सदर कामगिरी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version