Home क्राईम ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे व सुपा पोलीसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर जेरबंद

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे व सुपा पोलीसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर जेरबंद

 

अहमदनगर दि.१८ मे
सुपा पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कते मुळे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना पकडण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे.

घटनेची हकीकत अशी की १६ मे रोजी सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायतळे गावात मध्यरात्री च्या सुमारास काही दरोडखोर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या वेळी रात्ती गस्तीवर असणाऱ्या सुपा पोलीस ठाण्याचे सहह्याक फौजदार सुनिल कुटे व पो.कॉ मुसळे यांनी रायतळे गावाचे उपसरपंच अंकुश रोकडे आणि ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे काही ग्रामस्थांना माहिती देऊन दरोडेखोरांनी चोरून नेत असलेल्या चार गाईंच्या वाहनांचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग करूनचोरून नेत असलेल्या गाईनसह वाहन पकडण्यात पोलिसांना यश आलं त्यांचे कब्जात चोरी केलेल्या चार गाया दोन तलवारी तसेच एक कोयता मिळुन आला. बाबासाहेब जयसिंग काळे वय-22 रा.टाकरवण ता.गेवराई जि.बीड ) सुरेश यमाजी वाळके रा. लोणी सय्यदमीर ता.आष्टी ) चाचा पाचा भोसले वय-60 रा. रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी) दोन आरोपी पळून गेले असुन त्यांचा शोध सुरु आहे. वरिल आरोपी यांचेवर सुपा पो.स्टे 239/2023 भा.द.वि. कलम 395 आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पो. स.ई पवार हे तपास करत आहेत.

आरोपी चाचा पाचा भोसले याचेवर यापुर्वी सुपा,एम.आय.डी.सी.,तोफखाना,नगर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधिक्षक,प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारीअजित पाटील, सुपा पोलीस ठाण्याच्या श्रीमती ज्योती गडकरी,मार्गदर्शनाखाली तसेच रायतळे ग्रामस्थांच्या मदतीने पो.स.ई पवार, स.फौ. सुनिल नारायण कुटे,
चा.पो.कॉ सुरेश मुसळे यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version