Home शहर सुरभि हॉस्पिटलकडून कौटुंबिक जिव्हाळा जोपासण्याचे काम ; आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे;...

सुरभि हॉस्पिटलकडून कौटुंबिक जिव्हाळा जोपासण्याचे काम ; आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे; सुरभि हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य जनजागृती अभियान

अहमदनगर: दि.२७ डिसेंबर
वृद्धापकाळमध्ये विविध व्याधींचे संक्रमण होणे हा निसर्ग नियम आहे. त्यावर मात करण्यासाठी मन आनंदी ठेवणे आणि आरोग्याशी निगडित प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार करणे आवश्यक असते. ‘सुरभि हॉस्पिटल’ने ज्येष्ठ नागरिकांच्या निरामय आरोग्यासाठी कौटुंबिक जिव्हाळा जोपासण्याच्या उद्देशातून विविध आजारांवर जनजागृती अभियान सुरू केले, ही बाब गौरवास्पद असल्याचे अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.

 

विस्कळीत जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांबाबत अनेक समज गैरसमज आहेत. हृदयरोग, किडनी विकार, मूत्रविकार, अस्थिविकार, लिव्हर आणि पोटाचे आजार या संदर्भात अनेक शंका भेडसावत असतात. नागरिकांना आपल्या मनातील प्रश्न मोकळेपणाने डॉक्टरांना विचारता यावेत आणि त्यातून त्यांना उचित मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने येथील सुरभि हॉस्पिटलच्यावतीने ‘आरोग्य जनजागृती अभियान’ सुरू करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत ‘मूत्रविकार’ या विषयावर अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या सहकार्याने युरो सर्जन डॉ. अमित देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. बोरगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सुरभिचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश गांधी, पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नागनाथ पवळे, पोटविकार व लिव्हर तज्ञ डॉ. वैभव अजमेरे, लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. श्रीतेज जेजुरकर, डॉ. आशिष भंडारी, डॉ. अमित पवार, आनंदधाम ज्येष्ठ नागरिक मंचचे रमेशचंद्र बाफना, आर.डी मंत्री, प्रा. बी. एन. शिंदे, रंगनाथ गावडे, वसंत थोरात आदींसह पेन्शनर्स असोसिएशनसह शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंचचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. अमित देशपांडे यांनी मूत्रविकाराशी संबंधित अनेक समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधानही केले. या व्याख्यानासाठी 200 हून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राकेश गांधी, सूत्रसंचालन ॲड. गणेश शेंडगे यांनी केले, तर डॉ. अमित पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर व्याख्यानास उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सुरभि हॉस्पिटल येथे आठवडाभर मोफत समुपदेशन केले जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version