अहमदनगर २७ डिसेंबर
सिनेअभिनेत्री आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या आणि आता बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या दिपाली सय्यद भोसले यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम त्याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्या सोबत आर्थिक संबंध असून दीपाली सय्यद यांच्या दिपाली सय्यद भोसले सामाजिक फाउंडेशच्या माध्यमातून आर्थिक संबंध आहेत. दिपाली सय्यद अनेक वेळा दुबई जातात त्याची चौकशी केली तर त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल याचे सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो असा आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्विय सहह्याक ऍड भाऊसाहेब शिंदे यांनी नगर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
कुठल्याही क्षणी दिपाली सय्यद आणि राज्यपाल यांच्या कार्यकर्त्यांपासून माझा खून होऊ शकतो असा धक्कादायक आरोप करतांना भाऊसाहेब शिंदे यांनी केला असून राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या उपस्थितीत कोविड योद्धा पुरस्कार प्रदान केले हा कार्यक्रम दिपाली सय्यद यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी सर्व कोविड योध्याना पन्नास हजार रुपयांचे चेक देण्यात आले होते. मात्र हे चेक खोटे असून 50 लोकांना दिलेले चेक पैकी एकही चेक बँकेत जाऊन पैसे काढण्या लायक नसल्याने दिपाली सय्यद आणि राज्यपालांनी कोविड योध्याची फसवणूक केली आहे.
तसेच सांगली मध्ये कोविड काळात सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते त्या ठिकाणी नाव नोंदणी न झाल्याने लग्न झालेले आणि ज्यांना मुले आहेत अशा दाम्पत्याची लग्न लावली गेली आहेत या कार्यक्रमाला राज्यपालांनी उपस्थिती लावली होती.
आईध्या दौऱ्यात राज ठाकरेंची हत्या करायची होती त्याचा कट दिपाली सय्यद आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी आखला होता.त्या साठी अनेक वेळा दिपाली सय्यद दिल्लीला गेल्या होत्या दिपाली सय्यद यांनी जवळपास 17 ते 18 दिल्लीची वारी केलेली होती असा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
माझ्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी तर मी 30 जानेवारी रोजी नगर मध्ये पुन्हा पत्रकार परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ,इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला याच्या बरोबर दिपाली सय्यद यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत. त्यांच्या मद्यमातून दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टला हजारो कोटी रुपये पुरवले जाते याचे पुरावे ऑडिओ सहित घ्यायला तयार आहे असेही भाऊसाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.