अहिल्यानगर दिनांक 12 सप्टेंबर
नगर शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रोड भागात शुक्रवारी दुपारी जागेच्या ताब्यावरून दोन गटात चांगलीच झुंबड उडाल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली असून. ताबा घेण्यासाठी घेऊन गेलेल्या जेसीबी वर दगडफेक झाली असल्याची ही माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार अद्याप पर्यंत दाखल झालेली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका राजकीय पक्षाच्या नेत्याची आणि सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरात असलेल्या प्लॉट धारकाशी प्लॉटच्या ताब्या वरून चांगलीच झुंबड उडाली होती. शुक्रवारी दुपारी तो राजकीय नेता ताबा घेण्यासाठी प्लॉटवर आला होता. मात्र प्लॉट धारकाने त्या ठिकाणी मज्जाव केला. त्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी येथे यथेच्छ तोंडसुख घेतले. तर त्या ठिकाणी असलेल्या जेसीबी वर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटांची पांगापांगी झाली असली तरी याप्रकरणी अद्याप पोलिसांमध्ये कोणतेही तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार दाखल झाली नसली तरी परिसरात या घटनेची चांगली चर्चा असून. नेमका हा प्रकार काय हे अद्यापही समोर आलेले नाही. ताबा घेणारा राजकीय पुढारी असला तरी नेमका हा बळजबरीचा ताबा होता का, जागा विकत घेऊन मालक ताबा देत नसल्याने ताबा घेण्यासाठी राजकीय पुढारी आला होता. याबाबतही चांगलीच खमंग चर्चा या परिसरात सुरू आहे.