अहमदनगर दि.२८ जुलै
अहमदनगर शहरात विविध ठिकाणी ताब मारणाऱ्या टोळीचा सविस्तर लेख “आवाज महाराष्ट्राचा* या वेब पोर्टल द्वारे प्रसारित करण्यात आला होता ताबा मारणाऱ्या टोळ्या कशाप्रकारे सर्वसामान्य जनतेपासून ते करोडपती जागा मालकांच्या मोकळ्या जागेवर कशाप्रकारे ताबे मारतात याची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
ताबे मारण्याचे विविध प्रकार असून एक जुना प्रकार पुन्हा नव्याने ताबे मारणारी टोळी अमलात आणत आहे. विशेष म्हणजे या ताबे मारणाऱ्यांची म्हणजे भूखंड माफीयांची एक मोठी टोळी तयार झाली असून. यामध्ये काही व्यापारी सुद्धा सामील आहेत. मोक्याच्या जागा हेरून त्या जागेच्या मालकाचा सर्व सातबारा उतारा काढून तो मालक कुठपर्यंत विरोध करेल याची माहिती घेऊन ही टोळी त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर विशिष्ट समाजाच्या लोकांना ताबा मारण्यासाठी पाठवते. त्या मोकळ्या जागेवर त्या विशिष्ट समाजाच्या लोकांना राहण्यासाठी पत्रे,बांबू आणि इतर साहित्य या टोळीकडून पुरवले जाते. आणि त्यानंतर मग त्या जागा मालकाला मानसिक त्रास सुरू झाल्यावर ती जागा कवडी मोलाने विकत मागितली जाते कारण त्या जागेवर आधीच कोणीतरी ताबा मारला असल्याने ही जागा आम्ही खाली करून घेऊ मात्र आम्ही सांगेल त्याच भावात आम्हाला जागा मिळावी अशी आटही घातली जाते. आणि ती जागा हे भूखंड माफिया गिळंकृत करतात आणि ती दुसऱ्या माणसाला विकून करोड रुपये कमवतात अशी टोळी सध्या नगर शहरात सक्रिय झाली असून यामध्ये ताबा मारण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या लोकांची गरज आहे त्या सर्व लोकांचा समावेश या भूखंड माफियांच्या टोळीमध्ये असून एन केन प्रकारे जागा मालकाला कशाप्रकारे त्रास देता येईल याची सर्व अंमलबजावणी ही टोळी करते.
अहमदनगर शहरात जागेला सध्या पुणे औरंगाबाद पेक्षा जास्त भाव आल्याने थेट मुंबई पुणे औरंगाबाद येथील व्यापारी सुद्धा जागा घेण्यासाठी येत आहेत .मध्यंतरीच्या काळात मुंबईमधील एका डॉनने नगर शहरात एंट्री केली होती तर पुण्याच्या एका माफिया विरुद्ध ही नगर शहरात जागेबाबत गुन्हा दाखल झालाय यावरूनच नगर शहरातील जागेला किती भाव आलाय हे समजून येते.
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकाराबाबत पोलीस कारवाई करून ताबे मारणाऱ्या टोळीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती यावेळी काही नगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ज्यांच्या जागेवर ताबे मारले गेले आहेत त्यांच्यासोबत होते. पोलीस अधीक्षकां समोर या व्यापाऱ्यांनी सविस्तर माहिती देऊन ताबे कसे मारले जातात हे सांगितले
मात्र जेव्हा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत व्यापारी व्यापाऱ्याच्या मुळावर उठलाय अशी परिस्थिती नगर मध्ये असून काम एकाच आणि नाव दुसऱ्याचं अशी परिस्थिती नगर शहरात सुरू आहे.