अहमदनगर दि.२७ जुलै
अहमदनगर शहरातील मोकळ्या जागेवर विशिष्ट समाजाच्या लोकांनी बळजबरीने ताबा मारून जमीन मालकांकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला आहे. अशा लोकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे व्यापाऱ्यांच्या आणि ताबा मारलेल्या जागा मालकांच्या शिष्टमंडळासह जाऊन केली आहे.
अहमदनगर शहरातील अभय श्रीश्रीमाळ,जीवन कटारिया,पोपटलाल कटारिया, राहुल कटारिया जितेंद्र पोरवाल,यांनी या आधी जागा बळकावल्या बाबत तक्रारी केल्या असून त्याचप्रमाणे केडगाव येथील पठारे कुटुंबीयांच्या शेतीवर अशाच पद्धतीने बळकवण्याचा प्रकार समोर आला आहे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून यामध्ये जो कोणी दोषी असेल आणि या मागचा खरा सूत्रधार कोण हा समोर आणण्याची मागणी ही आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.