Homeक्राईमअहमदनगर शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले

अहमदनगर शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले

advertisement

अहमदनगर दि.२९ जुलै
अहमदनगर शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले असून नगर शहरातील उपनगर असलेल्या केडगाव परिसर खून झाल्याची घटना समोर आली आहे.


अहमदनगर जिल्ह्यात खून आणि दरोडे याचे सत्र सुरूच असून नगर शहरात मागील दोन आठवड्यापूर्वी ओंकार भागानगरे याच्या खुनाच्या घटनेने शहर हादरले होते ती घटना विस्मरणात जाते नाही तोच केडगाव उपनगरामधील केडगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील एका वीट भट्टी जवळ एका अज्ञात व्यक्तीचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार समजतात कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हा खून नेमका कोणाचा झाला याबाबत अद्यापही माहिती नसून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. अंदाजे 35 वर्षीय इसम असल्याचं माहिती समोर येत आहे.

मात्र मागील काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात अनेक गंभीर घटना घडत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अहमदनगर शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे ठळक अक्षरात राज्याच्या नक्षावर समोर आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular