राहुरी दि.३ ऑगस्ट
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील बारगाव नांदूर रोड वर एका गोडाऊन वर छापा टाकून पोलिसांनी सुमारे एक कोटीच्या वर असणाऱ्या औषध साठा पकडल्याची माहिती मिळत असून या मध्ये मोठ्या प्रमाणत व्हायग्रा गोळ्यांचा साठा असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय.
ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलवून या औषधा बाबत सविस्तर माहिती आणि तपासणी केली जाणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळतेय.