Home राजकारण नवनियुक्त ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंवर बलात्कार, धमकीचा गुन्हा दाखल

नवनियुक्त ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंवर बलात्कार, धमकीचा गुन्हा दाखल

ठाणे दि.२ ऑगस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठी चाल केली होती.मात्र आता उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदी नव्याने नियुक्त केलेल्या केदार दिघे यांच्यावर गंभीर आरोप झाले असून थेट अत्याचार आणि धमकीचे गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केदार दिघेंसोबत आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ठाण्याचे नवे जिल्हा प्रमुख ही मोठी जबाबदारी दिली होती. विविध मुद्द्यांवर ते एकनाथ शिंदे यांनाही घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच हा गुन्हा दाखल झाल्याने ठाण्यातलं राजकारण पुन्हा वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version