HomeUncategorizedतलठ्यावर गुन्हा दाखल दीड लाख रुपयांची लाचेची मागणी

तलठ्यावर गुन्हा दाखल दीड लाख रुपयांची लाचेची मागणी

advertisement

श्रीगोंदा दि.३१ ऑगस्ट

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव गावाचा तलाठी आकाश नारायण काशीकेदार याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदाराची पोकलेन मशीन एका शेतात उभी असताना पेडगावचे तलाठी काशी केदार आणि सर्कल डहाळे हे सदर पोकलेन उभे केलेल्या ठिकाणी आले आणि तक्रारदार यांना तुम्ही सदरचा पोकलेन वाळू उपसा करणेकरिता वापरत असल्याचे सांगून तक्रारदार यांना तुमच्या पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी 3,00,000/-रु. आम्हाला द्यावे लागतील असे म्हणाले त्यानंतर दिनांक 11/7/2023 रोजी सकाळी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे तक्रारदार यांना भेटण्यास बोलवले. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे त्यांची लाच मागणीची तक्रार नोंदवली. त्यानुसार दिनांक 11/07/2023 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी कारवाई दरम्यान यातील आलोसे काशीकेदार,तलाठी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2,00,000/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1,50,000/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम टप्प्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 31/08/2023 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular