Home शहर नैसर्गिक ओढे नाले बुजवण्याचे प्रकरण महापालिकेचे सर्व्हेक्षण पूर्ण अनेक ठिकाणच्या धक्कादायक बाबी...

नैसर्गिक ओढे नाले बुजवण्याचे प्रकरण महापालिकेचे सर्व्हेक्षण पूर्ण अनेक ठिकाणच्या धक्कादायक बाबी आल्या समोर तब्बल इतक्या ठिकणी ओढे नाले बुजवले

अहमदनगर दि.२७ ऑगस्ट

अहमदनगर शहराला यावर्षी पावसाने चांगलेच झोपून काढले आहे त्यामुळे यावर्षी नगर शहरातील अनेक घरे हे पाण्याखाली गेल्याचं चित्र गेल्या चार महिन्यात तीन वेळेस दिसून आले आहे मात्र हे घरे पाण्याखाली जाण्याचे मुख्य कारण म्हणजे नगर शहरातील जुने नैसर्गिक ओढे नाले (blocking natural streams and drains) बुजवून त्यावर टाकून बांधकाम केल्याने हे पावसाचे पाणी(rain water) नागरिकांच्या घरात घुसले होते. याबाबत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही चांगलेच चर्चा झाली होती.

सभेत महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर(sampat barsakr )यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाने नैसर्गिक ओढे-नाले बुजवून व त्यावरील ले-आऊट मंजूर करून बांधकाम परवानग्या देताना लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. तर या विभागाच्या गैरव्यवहारांची तक्रार सक्त वसुली संचालनालयाकडे (ईडी) करण्याची मागणी बारस्कर यांनी महासभेत केली होती.

त्या महासभेत शहरातील बुजवलेले ओढे-नाले व त्यामुळे लोकांच्या घरात घुसलेल्या पाण्याच्या विषयावरून विरोधीपक्ष नेते बारस्कर यांच्यासह नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, कुमारसिंह वाकळे, अनिल शिंदे, प्रकाश भागानगरे, रवींद्र बारस्कर, विजय पठारे, योगीराज गाडे, डॉ. सागर बोरुडे तसेच नगरसेविका रुपाली वारे, सुनीता कोतकर,पल्लवी जाधव, मालन ढोणे आदींनी केवळ याच विषयावरून मनपा प्रशासनास धारेवर धरले होते .

ओढे-नाले बुजवण्याच्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करू. एमआरटीपी अ‍ॅक्टप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवूनतपासणी केली जाईल तसेच ओढ्या-नाल्यांवर टाकल्या गेलेल्या प्लॉटवरबांधलेल्या बांधकामांनाही नोटीसा पाठवून ते बेकायदेशीर असतील तर त्यांचेले-आऊट नामंजूर करण्याचीही नियमाप्रमाणे कारवाई करू, अशी ग्वाही आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महासभेत दिली होती त्यानंतर एका संस्थेद्वारे नगर शहरात सर्व्हेक्षण करण्यात आले असून या सर्व्हेक्षण मध्ये जवळपास 38 ठिकाणी नैसर्गिक ओढे नाले बुजवुन त्यांचा मार्ग बदलला असल्याचे समोर आले आहे तर काही ठिकाणी पाईप टाकून नाल्यांचा आकार अत्यंत लहान करण्यात आला आहे. या सर्व सर्वेची माहिती मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे आली असून आता याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेऊन याबाबतची सविस्तर माहिती दिल्यानंतर पुढील अतिक्रमण काढण्याची कारवाई होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version