Home देश महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या वादात सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिले स्व....

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या वादात सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिले स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू

दिल्ली दि.२७ सप्टेंबर –

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सूनवणी आज सकाळपासून दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात सुरू होती. यावेळी आज शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे तर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या बाबतीत सांगताना घटनापीठाने आयोगाचे कोणतेही कामकाज थांबणार नाही असे स्पष्ट केल्याने आता निवडणूक चिन्ह बाबत निवडणूक आयोग फैसला करू शकते एकनाथ शिंदे गट हा निवडणूक आयोगाकडे या आधीच गेला आहे. तर उद्धव ठाकरे गट हा याबाबत स्थगिती मागत होता. मात्र घटनापीठाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सुरू असताना आज एकनाथ शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नातू दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे पुत्र निहाल ठाकरे हे शिंदें गटाच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित होते.

या आधीच निहार ठाकरे यांनी शिंदे गटाच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतला होता. तसेच स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची सेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असल्याचे निहार ठाकरे यांनी याआधीच सांगितलं होतं.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version