अहमदनगर दिनांक 12 ऑक्टोबर
मागील आठवड्यात अहमदनगर शहरातील मुख्य कापड बाजारात अतिक्रमण आठवावे अशी मागणी नगर व्यापारी महासंघाने महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना भेटून केली होती. मागील तीन महिन्यापूर्वी याच अतिक्रमण प्रश्नावरून नगर व्यापारी महासंघाने उपोषणही केले होते. त्यावेळी अतिक्रमण हटवण्यात येऊन अतिक्रमण करणाऱ्यांना वेगळी जागा देऊ असे आश्वासन तत्कालीन आयुक्त शंकर गोरे यांनी दिले होते त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्तपदी डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आणि पथविक्रेत्यांना जागा देण्याचा प्रश्न पुन्हा मागे पडला होता.
मात्र नगर शहरातील कापड बाजारात पुन्हा अतिक्रमण होऊन नागरिकांना वाहने लावण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. तसेच कापड बाजारात खरेदीसाठी जाणे म्हणजे एक दिव्य पार करणे अशीच अवस्था कापड बाजाराची होती. रस्ता कमी आणि अतिक्रमणे जास्त झालेली आहेत. नागरिकांना पायी चालणे मुश्किल होत असल्याने कापड बाजारातील व्यापारी पुन्हा आक्रमक झाले होते.त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये काही वाद न होता अतिक्रमणे दूर करावे अशी मागणी व्यापारी महासंघाने महानगरपालिकेकडे केली होती.
त्यानुसार बुधवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमणे विरोधी पथकाने कापड बाजारातील अतिक्रमे हटवली आहेत. मोची गल्ली,शहाजी रोड, सारडा गल्ली येथील पथविक्रेत्यांना हटवले आहे. काहींच्या हात गाड्या व टेबलही जप्त केले आहे. मात्र बुधवार असल्याने बाजारातील बरीच दुकाने बंद असतात तसेच पथविक्रेतेही कमी असतात. मात्र ही अतिक्रमण मोहीम एक दिवसापूर्वी राबवता पुढील आठवडाभर राबवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. कारण अतिक्रमण पथक आल्याचे समजताच काही अतिक्रमण धारक गल्लीबोळात लपून बसतात आणि अतिक्रमण पथक पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर उभे राहतात त्यामुळे या अतिक्रमण मोहिमेत सातत्य हवे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
.