अहमदनगर दि.१२ ऑक्टोबर-
अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ने नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी वेळोवेळी सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आपल्या आरोग्याची तपासणी करून वेळेवर आजाराचे निदान करता यावे यासाठी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करत आहोत गरजू रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आजारपणाकडे दुर्लक्ष करीत असतात. यासाठी अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गरजू रुग्णांना मोफत शिबिराच्या माध्यमातून मदतीचा आधार देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन डॉ. शशिकांत फाटके यांनी केले.

अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये १३ ते १९ ऑक्टोंबर पर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिरात गरजू रुग्णांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा
१३ ऑक्टोंबर रोजी दंत रोग तपासणी शिबिरामध्ये डॉ. हरीश सलुजा , डॉ.संजय आसनानी , डॉ. शशिकांत फाटके, डॉ. वंदना फाटके, डॉ. अभिषेक मुळे, डॉ. श्रद्धा धोत्रे, डॉ. अश्विनी जाधव, डॉ. तन्वी भंडारे इत्यादी डॉक्टर तपासणी करणार आहेत. याच दिवशी न्यूरोसर्जन डॉ. सचिन चेमटे पाटील हे मेंदू रोग व मणके विकार तपासणी व उपचार करणार आहेत.शिबिरात डिजिटल एक्सरे रू.200,सी. टी स्कॅन रू.1000 मात्र, एम.आर.आय.1250 रू मात्र या सवलतीच्या दरात केले जाणार आहेत. दि.१४ ऑक्टोंबर रोजी स्त्री रोग तपासणी व गर्भवती माता तपासणी शिबिरात डॉ. निलेश शेळके, डॉ. गिरधारी जेधे हे रुग्णांची तपासणी करणार असून शिबिरात गर्भवती मातांची सोनोग्राफी रू.600 मात्र मध्ये केली जाईल. तसेच हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स व इतर जनरल शस्त्रक्रिया डॉ.गजानन वांगल हे तपासणी करणार आहेत व शिबिरात निवड झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया अत्यंत सवलतीच्या दरात करणार आहेत. दि.१५ ऑक्टोंबर रोजी उच्च रक्तदाब मधुमेह तपासणी व उपचार शिबिरात डॉ. तुषार तनपुरे , डॉ. प्राजक्ता पारधे , डॉ. प्रदीप जैस्वाल हे रुग्णांची तपासणी करणार आहेत तसेच कान, नाक, घसा तपासणी व उपचार शिबिरात डॉ. कल्पना गायकवाड हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.१६ ऑक्टोंबर रोजी मोफत मुळव्याध शस्त्रक्रिया शिबिरात डॉ. प्रदीप तुपेरे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत व मोफत मूळव्याध शस्त्रक्रिया करणार आहेत.मूळव्याध शिबिरात रक्ताच्या तपासण्या व औषधखर्च रुग्णांना अल्पदरात आकारला जाईल.मूळव्याधचे रूग्णांनी शिबिरात येताना उपाशीपोटी यावे.सकाळी 6 नंतर काही खाऊ पिऊ नये.व येताना आपले आधार कार्ड, रेशन कार्ड ची झेरॉक्स सोबत आणावी.१७ ऑक्टोंबर रोजी पोटाचे विकार व तपासणी शिबिरात डॉ. संतोष पालवे हे उपचार करणार आहेत.१८ऑक्टोंबर रोजी हृदयरोग तपासणी व उपचार शिबिरात डॉ. सुदाम जरे हे रुग्णांवर उपचार करणार आहे तसेच अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरात डॉ. निखिल गांधी, डॉ. प्रशांत तांदळे हे तपासणी करणार आहेत.अस्थिरोग तपासणी शिबिर मध्ये संपूर्ण खुबा बदली , संपूर्ण गुडघा बदली इम्पोर्टेड इम्प्लाट सह , मणक्याच्या शस्त्रक्रिया अत्यंत सवलतीच्या दरात केल्या जातील.या शिबिरात एम. आर आय रू.1250, सीटी स्कॅन रू 1000, डिजिटल एक्सरे रू.200 मात्र मध्ये केले जातील.१९ ऑक्टोंबर रोजी बालरोग तपासणी शिबिरामध्ये डॉ. सुप्रिया गुंजाळ तर फुप्फुस श्वसन विकार , ॲलर्जी, टीबी, न्युमोनिया, जुनाट खोकला, व इतर आजार तपासणी व उपचार शिबिरात डॉ. सचिन पानसरे हे रुग्णांची तपासणी करणार आहे. शिबिरामध्ये सहभागी होणारे रुग्णांनी अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
नाव नोंदणी करीता संपर्क 8686171738/8686171758/ मो.9370666489.रूग्णांनी येताना आपले जुने रिपोर्ट्स ची फाईल असल्यास बरोबर आणावी. तरी जिल्हाभरातील रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी व उपचार करून घ्यावेत अशी माहिती अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. शशिकांत फाटके व डॉ. वंदना फाटके यांनी दिली.