Home शहर मार्केट यार्ड चौका समोरील भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा...

मार्केट यार्ड चौका समोरील भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा महानगरपालिकेच्या बाजूने हायकोर्टातचा निकाल अनेक वर्षापासून सुरू होता जागेचा वाद

अहमदनगर दि.२२ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील नगर औरंगाबाद या महामार्गावरील मार्केट यार्ड समोरील हॉटेल सुखसागर व महापलिका अनेक वर्षांपासून जागेवरून औरंगाबाद हायकोर्टात मध्ये वाद सुरू होता या ठिकाणी सध्या हॉटेल सुखसागर आणि त्या शेजारील जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा अशी परिस्थिती होती.मात्र या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा उभारून बाकीच्या जागेत बगीचा आणि सुशोभीकरण करावे अशी अनेक वर्षापासून आंबेडकरी अनुयायांची होती. यासाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे महानगरपालिका त्या ठिकाणी काहीच करू शकत नसल्याने अखेर आज औरंगाबाद हायकोर्टात या प्रकरणाचा निकाल लागला असून हा निकाल महानगरपालिकेच्या बाजुने लागला असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते अजय साळवे यांनी दिली आहे.

गेल्या पंचवीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या जागेसाठी लढा देत होते अनेक वेळा महानगरपालिकेत या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा बसवण्याचा ठराव मंजूर झाला होता अनेक महापौरांनी यासाठी प्रयत्नही केले होते शहराचे आमदार संग्राम जगताप तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेऊन हा पुतळा मार्केट यार्ड समोरील जागेतच बसवण्याची ठाम भूमिका घेतली होती त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून औरंगाबाद हायकोर्टात एडवोकेट होन आणि महानगरपालिकेचे एडवोकेट लोखंडे यांनी बाजू लावून धरली होती त्यामुळे तीन महिन्यातच या प्रकरणाचा निकाल लागला असून आता आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा अजय साळवे यांनी व्यक्त केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version