Home राज्य दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांना परवानगी नाही मुंबई महानगरपालिकेचं पत्र

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांना परवानगी नाही मुंबई महानगरपालिकेचं पत्र

मुंबई दि.२२ सप्टेंबर –

शिवसेनेतील (Shiv Sena) सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई महानगरपालिकेनं दोन्ही गटांना तसे पत्र देऊन कळवले आहे .

. मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version