Home Uncategorized बनावट सोनेतारण घोटाळा आरोपींची सांख्य 36, आणखीन अकरा खात्या मध्ये आढळले अडीच...

बनावट सोनेतारण घोटाळा आरोपींची सांख्य 36, आणखीन अकरा खात्या मध्ये आढळले अडीच किलो सोने

अहमदनगर दि.१६ सप्टेंबर

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोने तारण कर्ज प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असून कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 36 इतकी झाली असून अजून वाढण्याची शक्यता आहे.

जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सनवली असून त्यांची रवानगी सबजेल मध्ये करण्यात आली अली आहे. पोलिसांनी गुरुवारी काही संशयित खात्यांची तपासणी केल्यानंतर जवळपास 11 खात्यांमधून अडीच किलो बनावट सोने मिळून आले असून सुमारे 89 लाख 14 हजार रुपये या सोन्याची किंमत होते.

अजून काही संशयास्पद खाते तपासायचे असून यामधूनही बनावट सोने मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे आता हा घोटाळ्याची रक्कम वाढत चालली आहे.

बनावट सोने कारण ठेवून कर्ज प्रकरण करणाऱ्या या टोळीने नगर शहरातील नागेबाबा पतसंस्थेमध्ये बनावट सोने ठेवल्याची शक्यता असून पोलिसांना असून पोलिसांनी याप्रकरणी बँकेला तसे लेखी पत्रही पाठवले आहे.त्यामुळे आता नागेबाबा पतसंस्था तसेच भिंगार मधील महात्मा फुले पतसंस्थेचे काही पावत्या सापडल्याने या पतसंस्थेतही किती रुपयांचे सोने तारण करून पैसे काढले याबाबत पुढील तपासात माहिती मिळू शकते.

आळकुटे असा शोधायचा सावज

यातील मुख्य आरोपी सुनील आळकुटे याच्या स्वतःची ज्ञान लीला अर्बन मल्टी निधी या नावाची संस्था असून नगर आणि एमआयडीसी मध्ये शाखा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून तो छोट्या मोठ्या विक्रेत्यांकडून रोजच्या बचत खात्याच्या माध्यमातून पैसे जमा करत असेल जेव्हा कोणाला कर्जाची गरज पडत असेल तेव्हा आळकुटे हा स्वतःचे सोने गहाण ठेवून तुम्हाला पैसे देतो असे सांगून कर्जदारांना भुलवून इतर अजय कपालेच्या माध्यमातून सोने गहाण ठेवून मोठी रक्कम काढून त्यांना गरजेपुरती रक्कम देत असे ही साखळी हळूहळू वाढत गेली.

श्रीतेश पानपाटीलला उघडायची होती स्वतःची पतसंस्था

तर भिंगारच्या श्रीतेश पानपाटील यांने सुद्धा या माध्यमातून मोठी माया जमा केली असून आलमगीर भागात आलिशान बंगला बांधल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर पानपाटील येणे स्वतःची पतसंस्था उघडण्यासाठी कागदपत्रे जमा करून लायसन मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र हे प्रकरण उघड झाल्या मुळे सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

तर श्रीतेष पान पाटील याचा एक साथीदार असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर असून त्याला पकडल्यानंतर अजून काही बँकांमधील बनावट सोने तारण ठेवून पैसे काढल्याचे प्रकरण समोर येऊ शकते.

आणखी एका पतसंस्थेचे नाव आले समोर

तर नगर शहरातील शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आणखी एक पतसंस्थेमध्ये बनावट सोने तारण ठेवून पैसे काढल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे आता ही मोठी प्रतिष्ठित संस्था असून यामध्ये पोलिसांनी तपास केल्या नंतर किती रुपयांचा घोटाळा झाला हे समोर येण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version