Home शहर नगर शहरातील विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा पाहायला मिळाले हे दृश्य नगर बदलतंय व्हिडीओ...

नगर शहरातील विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा पाहायला मिळाले हे दृश्य नगर बदलतंय व्हिडीओ होतोय व्हायरल

अहमदनगर दिनांक 11 सप्टेंबर

अहमदनगर शहरातील (ahmednagar city)विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे गणेश विसर्जन शुक्रवारी रात्री पार पडली दरवर्षीप्रमाणे अहमदनगर शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती बरोबर सहाच्या ठोक्याला दिल्लीगेट वेशीच्या बाहेर पडला. विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर आलेल्या गणेश उत्सवाला यावर्षी मोठा उत्साह जाणवत होता.शहरातील अनेक गणातपती मंडळा समोर कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते.

मात्र या गर्दीत नगर शहरात एक दृश्य प्रथमच पाहायला मिळालं ते म्हणजे दिल्लीगेट भागात शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीष जाधव यांच्या दिल्लीगेट तरुण मंडळाने लावलेल्या डीजे वर तरुणांसह तरुणींनी चांगलाच ठेका धरलेला दृश्य पाहायला मिळालं या आधी मानाचा गणपती विशाल गणपती समोर पारंपारिक टिपऱ्या वर ठेका धरताना महिला अनेक वेळा पाहिल्या होत्या मात्र आता यावर्षी दिल्ली गेट येथे अनेक तरुणींनी मनसोक्त डान्स करून गणपती उत्सवाचा आनंद लुटला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version