Home क्राईम नगरच्या त्या व्यापाऱ्याकडून माझ्या जीविताला धोका पुणे येथील प्रतीक काबरा यांचे पोलीस...

नगरच्या त्या व्यापाऱ्याकडून माझ्या जीविताला धोका पुणे येथील प्रतीक काबरा यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी

अहमदनगर दि.२५ सप्टेंबर

पुणे येथील प्रतीक काबरा या कापड व्यवसायिकाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी त्याने पुणे येथे नगर शाहरतील सनी जाधव विरोधात गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात आता पुणे येथील न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक वॉरंट जारी केले आहे. हे अटक वॉरंट तोफखाना पोलिसांकडे आले असून त्याबाबत अंमलबजावणी झाली का नाही हे मात्र समजू शकले नाही .

जाधव याच्या विरोधात पुणे येथील प्रतीक काबरा नामक व्यापाऱ्याने जीवे मारण्याचे धमकी दिल्याची तक्रारही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदने द्वारे करण्यात आली आहे.तसेच या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला याची प्रतही देण्यात आली आहे.मात्र नगरचा हा व्यापारी खुलेआम शहरात फिरत आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाचे वॉरंट असेल तर पोलीस त्याच्या घरी जाऊन लागेच त्याची अंमलबजावणी करतात. मात्र या व्यापाऱ्याच्या विरोधात अटक वॉरंट तसेच तक्रार देऊनही पोलीस कारवाई का करत नाही याचे गौडबंगाल अद्यापही उघडले नाही.सर्वसामान्यांना ज्या प्रकारे तातडीने पोलीस पकडायला जातात त्या प्रकारे अशा धनदांडग्या लोकांना पोलीस का पकडत नाही असा प्रश्न समोर येतोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version