नगर (प्रतिनिधी)- मौजे सावेडी अहिल्यानगर येथील प्लॉट नं. ४७/४ब /४ या जागेची खरेदी दिलेली असताना इंजि. रवींद्र बोरुडे यांनी अहुजा, मेहतांनी, भुतकर यांच्या म्हणण्यानुसार बांधकाम अर्जावर शरद उगले यांच्या खोट्यासह्या करून ३० एप्रिल २०२४ रोजी मिश्र वापरासाठी ऑफलाइन बांधकाम परवानगी घेतली परवानगी घेतानी सोबत जोडणारी कागदपत्राची पूर्णता असल्याचे आढळले अग्निशमन विभागाची एनओसी तसेच तहसीलची उत्खननाची परवानगी, लिफ्टची परवानगी असे अनेक परवानग्या न घेण्यात आल्या त्यात सगळ्यात मोठी बनावट म्हणजे ब्लू प्रिंट ही मेहतांनी, भुतकर, आहुजा यांच्या नावाची आहे. त्या ब्लू प्रिंट वर कोणत्याच मालकाच्या साह्या नाही तरी तो लेआउट मंजूर करण्यात आला. प्रथम दर्शनी त्या लेआउट मध्ये मनपाचा २.५ गुंठ्याचा ओपन स्पेस हा त्या वेळेचे सहाय्यक नगर रचनाकार चारठणकर व आयुक्त पंकज जावळे यांनी संबंधित मालक व इंजिनिअरची अर्थपूर्ण व्यवहार करून ओपन स्पेस रद्द न करता त्याचा उगले यांच्या प्लॉटमध्ये समावेश करून मनपाची अंदाजे रक्कम १.५ कोटी रुपये इतकी असलेली ओपन स्पेस जागा हेराफेरी करून ही जागा(udcpr २०२२) अधिनियमची प्रत जोडून दिशाभूल करून ओपन स्पेसची ताब्यात देण्याची पूर्णपणे अंमलबजावणी न करता शासनाची फसवणूक करून त्या मालकाच्या घशात घालून बांधकाम परवानगी पूर्ण बोगस पद्धतीने देण्यात आलेली आहे.
ओपन स्पेस हा तेथून हालवून त्यांच्या प्लॉटमध्ये समावेश केला गेला ओपन स्पेस हा हलवण्यासाठी कोणताही अर्ज केला गेला नाही हे नगर शहरातील पहिलेच प्रकरण आहे. एका व्यक्तीसाठी विशेष नियम लादण्यात आले सदर प्लॉट हा ओपन स्पेस मध्ये आहे तसेच तो प्लॉट हा रोड वाइंडिंग मध्ये सुद्धा आहे तरीसुद्धा परवानगी दिली गेली अहुजा, मेहतांनी, भुतकर यांनी आपल्या अंगलट हा विषय येऊ नये म्हणून सदर परवानगी घेताना बांधकाम परवानगीसाठी जागेचे मालक बदलले गेले आहे. खरेदी खत वर मालक दुसरे तसेच दोन दोन उतारे व ओपन स्पेस चे वेगवेगळे दोन नवीन उतारे या फाईलला जोडण्यात आलेले नाही खरेदी खत व बांधकामार्जातील स्वाक्षरीत खूप मोठ्या प्रमाणात तफावत दिसते सदर फाईल मध्ये दोन ब्लू प्रिंट जोडलेले होते त्या फाईल मध्ये आता फक्त एकच ब्लू प्रिंट असल्याचे दिसते महत्त्वाचे म्हणजे दुसरी ब्लू प्रिंट ही पालिकेतून गायब करण्यात आली त्या ब्लू प्रिंटवर रोड वाइंडिंग वगैरे सगळ्यांचा उल्लेख होता व सदर छाननी अर्जात क्लार्क ची स्वाक्षरी सुद्धा नाही आयुक्त जावळे व चार्टनकर यांनीच त्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात आलेले आहे. त्यांच्या अधिकाऱ्याचे व इंजिनियर मध्ये तब्बल २० ते २५ लाख रुपयांची अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा आहे हे बांधकामाची परवानगी व या प्लॉटची मंजुरी पूर्णपणे बोगस करून देण्यात आली आहे सदर जागा ही बिगर शेतीसाठी त्यावेळेचे जिल्हाधिकारी अनबलगन यांनी २०११ मध्ये काही अटी शर्तीने मंजूर केले होते. त्या अटीनुसार १ वर्षाच्या आत ती जागा डेव्हलप करून वापरात घेऊन संबंधित विभागास कळवावे असे बिगर शेतीमध्ये दाखल्यामध्ये कळवले होते त्या अटी शर्तीचे पालन न केल्यास बिगर शेती ऑर्डर ही स्वतःहून रद्द समजली जाईल दर्शवण्यात आले असताना पण तसे काही जागा मालकांकडून करण्यात आले नाही कित्येक वर्ष जागाही पडून होती. या जागेचा व्यवहार एजंट म्हणून स्व. अंकुश चत्तर यांनी केला होता या व्यवहारात कुठेतरी अंकुश चत्तर यांच्या मृत्यूशी असु शकतो कारण त्या जागेच्या काही अंतरावरच चत्तर यांची हत्या झाली ही जागा ओपन स्पेस असून बळकवण्यासाठी जनक अहुजा, जतीन आहुजा, लोकेश मेहतांनी, विजय भुतकर यांनी अंकुश चत्तर यांचा तर वापर केला नाही ना अशी शंका आहे. अधिकाऱ्यांना धरून जागेच्या बोगसह्या बोगस कागदपत्रे सादर करून परवानगी घेणे चारी जागा मालक हे नगरमधील मोठे प्रसिद्ध व्यापारी आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बांधकाम फाईल ऑफलाईन करून मनपाचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आमची विनंती आहे की आपण या प्रकरणात संबंधित बांधकाम तत्काळ थांबून सदर बांधकाम परवानगी रद्द करून संबंधित जागा मालक, इंजिनीयर, अधिकारी, यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून निपक्षपणे चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व मनपाने ती जागा तत्काळ सील करून संबंधित पालिकेच्या ताब्यात घ्यावी व इंजिनीयरला ब्लॅक लिस्टला टाकण्यात यावे या इंजिनियरची मनपा मधील आत्तापर्यंत जेवढे कामे झाले याची देखील चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते विजय घासे यांनी केली आहे.