Home Uncategorized छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक चित्रांवर भित्तीपत्रक लावणे पडले महागात…. कोतवाली पोलीस स्टेशन...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक चित्रांवर भित्तीपत्रक लावणे पडले महागात…. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल..

अहिल्यानगर दिनांक १७ फेब्रुवारी

उड्डाण पुलाच्या खलील पिलरवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावर भित्तीपत्रक चिकटवणे एकाला चांगलेच महागात पडले असून महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश बाळकृष्ण कोतकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाल पोलीस स्टेशन मध्ये आर्य करिअर अॅकडमी पोलीस भरती स्पेशल बेंच संगमनेर या संस्थे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळीवाडा बसस्थानक परीसरातील स्टॅण्ड मधील एस टी बसेस बाहेर पडतात त्या बाजु समोरील पुलाखालील पिलरला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासाचे चित्र रेखाटलेले आहेत त्या चित्रावर आर्य करिअर अॅकडमी पोलीस भरती स्पेशल बेंच संगमनेर यांनी पिलरच्या दोन्ही बाजूला जाहिरातीचे पोस्टर लावुन शहर विद्रुपीकरण केलेले आढळून आले होते. सुनिल खंडेराव कंटगरे यांच्या संस्थेचे हे पोस्टर लावलेले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र मालमत्तेच्या विदूपीरकणास प्रतिबंद अधि. 1995 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version