Homeशहरशहर वाहतूक शाखा नेमकी करते काय ? दंडाची आकडेवारी वाढवून बेशिस्त वाहतूक...

शहर वाहतूक शाखा नेमकी करते काय ? दंडाची आकडेवारी वाढवून बेशिस्त वाहतूक सुधारणार नाही… साहेब आता रस्त्यावर उतरा गाडीत बसून वाहतूक सुरळीत होऊ शकत नाही.. बेशिस्त रिक्षा, पियागो चालकांना “त्याचा” वरदहस्त असतो…

advertisement

अहमदनगर – दि.१० डिसेंबर

अहमदनगर शहर हे बेशिस्त वाहतुकीचे शहर म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. तर वाहतूक शाखेचे अवघे 50 ते 60 कर्मचारी लाखो वाहनांचे नियमन करत आहेत. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नगर शहरातून पुणे छत्रपती संभाजीनगर तसेच सोलापूर मनमाड कल्याण निर्मल असे मोठमोठे महामार्ग जात असल्यामुळे या महामार्गांवर 24 तास वाहतूक सुरू असते.. त्यामुळे नगर शहराला मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा भार सहन करावा लागत आहे. उड्डाणपूल झाला की वाहतूक थोडी-फार सुरळीत होईल, असे नगरकरांना वाटले, पण तसे काही झाले नाही.

नगर शहरात तर वाहतूक कोंडी नित्याची झालेलो आहे. याला कारणीभूत बेशिस्त पार्किंग आणि अहमदनगर शहरातील अतिक्रमणे असून नगर शहरात रोड म्हणजे स्वतःची मालमत्ता असल्यासारखं प्रत्येक नागरिक याचा वापर करत असतो अहमदनगर शहरात अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या रोडवरच लावल्या जातात आणि मग त्यापुढे त्या ठिकाणी आलेल्या ग्राहकाच्या गाड्या लागल्यामुळे चिंचोळ्या रोड मधून त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना प्रवास करावा लागतो मात्र यावर ना महानगरपालिका अतिक्रमण विभाग कारवाई करतो ना शहर वाहतूक पोलिस कारवाई करतात त्यामुळे नगर शहरातील विशिष्ट पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आता नगरकरांच्या आंगवळणी पडली आह

चौपटी कारंजा, नेता सुभाष चौक, दिल्ली गेट, सक्कर चौक, माळीवाडा, कापड बाजार, तेली खुंट,रामचंद्र खुंट, दिल्ली गेट, प्रेमदान चौक, एकविरा चौक,कोठला, मार्केट यार्ड चौक, सक्कर चौक, माळीवाडा बसस्थानक, दिल्ली गेट, अमरधाम, कापड बाजार, टिळक रोड, सर्जेपुरा, बोल्हेगाव फाटा, प्रोफेसर कॉलनी चौक, नेप्ती नाका ,या प्रमुख ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झालेली आहे.

शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही अशी ओरड नेहमी या शाखेच्या प्रमुखांकडून होत असते. तर वाहतूक शाखेचा भर हा ऑनलाईन दंड आकारण्यातच जास्त जात असल्याचे नेहमी निदर्शनास येत आहे शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे आता फोटो काढून दंड आकारण्याचा नियम आल्यामुळे प्रत्येक पोलीस हातामध्ये मोबाईल घेऊन आणि यंत्र घेऊन फोटो काढण्यात मग्न असतो त्यामुळे वाहतुकीची ऐशी तैशी रोजच होत असते तर काही कर्मचारी वेगळ्याच कामात गुंतलेले असल्यामुळे त्यांच्यावर मोठा वरदहस्त असल्यामुळे ते कुठे आणि कसे काम करतात याकडे कोणीच लक्ष देत नाही.

शहरातील १५ पैकी मोजक्याच चौकांत ट्रॅफिक सिग्नल सुरू आहेत. नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील डीवायएसपी चौक आणि पत्रकार चौक,प्रेमदान चौक, वगळता इतर ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नलची बंद आहेत.

शहरातील अनेक महामार्गांवर विशेषतः पत्रकार चौक ते प्रेमदान चौकापर्यंत काही ठराविक दुकाने हे चार चाकी वाहनांचे सजावटीचे काम करत असतात मात्र या सर्व दुकानांचे काम थेट महामार्गावरच सुरू असते त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होतो.

नगर शहरात बेसिस्तपणे वाहतूक करणाऱ्या पियागो रिक्षा चालकांवर तर कोणाचा धाक राहिलेला नाही कधीही कुठेही थांबत प्रवासी घेण्यात मग्न असणाऱ्या या रिक्षा चालकांना “वळी”चा वरदहस्त असल्यामुळे हे रिक्षा चालक बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून प्रवास करताना सर्रास दिसून येतात मात्र “वळी” च्या वरदहस्त असल्यामुळे त्यांना हात लावायची कोणाची हिंमत होत नाही.

नगर शहरातील एसटी स्टँड परिसर असो अथवा शहरातील महामार्ग सर्वच ठिकाणी बेशिस्त पार्किंगचे दर्शन होताना रोजच नगरकर पाहत असतात मात्र शहर वाहतूक नियंत्रण शाखा हे दंडाची आकडेवारी दाखवून किती काम करत आहोत हे नेहमीच सांगत असतात.

तर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षांनी आता शिस्तीचा दंडुका फिरवून बेशिस्त वाहतूक चालकांवर कारवाई करण्याचे काम करावे लागणार आहे. फक्त गाडीत बसून चक्कर मारल्याने वाहतूक सुरळीत होत नाही तर रस्त्यावर उतरून बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उभारला तरच बेशिस्त वाहतूक सुधारू शकते.

तर अहमदनगर शहरातून जड वाहतूक काही काळ बंद असतानाही ती कशाप्रकारे शहरातून जाते याची वेगळीच कहाणी आहे ती कहाणी लवकरच वाचकांसाठी आम्ही घेऊन येणार आहोत. जड वाहतूक शहरा मधून जाण्यासाठी कशी साखळी कार्यरत असते याचा लेख सविस्तर लवकरात प्रसिद्ध करण्यात येईल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular