अहिल्यानगर, दि. १६ एप्रिल :
अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील अंमली पदार्थ साठवणूक केंद्रातून अल्प्राझोलम या अंमली पदार्थाच्या अपहार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याविरोधात चौकशी व कारवाईचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांच्या उपोषणामुळे प्रशासनाला झुकावे लागले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यासंदर्भात लेखी आदेश देत कारवाईचे आश्वासन दिले आहे.

या प्रकरणात शेख यांनी यापूर्वीच राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करून कबाडी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच १५ एप्रिलपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, नगरचे पोलीस अधीक्षक यांनी १५ एप्रिल रोजी चौकशी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविल्याचे पत्र शेख यांना दिले होते. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने शेख यांनी १६ एप्रिल रोजी नाशिक येथे उपोषण सुरू केले.
या उपोषणाची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी शेख यांच्याशी थेट चर्चा करून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर किरणकुमार कबाडी यांच्याविरोधात चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आदेश देण्यात आले.
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर शेख यांनी उपोषण स्थगित केले. मात्र, कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ही कारवाई होणार असली तरी सध्या स्थानिक गुन्हे शाखा यामध्ये मुळे नामक एका खाजगी ही समाजाची चांगलीच चब ढब वाढलेली आहे विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा हाच कर्मचारी हाताळतो का काय अशी चर्चाही बाहेर दबक्या आवाजात सुरू असून याला साथीदार म्हणून सारस नगर मधील एक बिंगो चालक साथीला आहे सध्या सुपारी बहाद्दर आणि मुळे हे जोरदारपणे बॅटिंग करत असून यांच्या चबढबी मुळे जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी चांगले काम करतात त्यांनाही विनाकारण बदनामीला समोर जावे लागते खाकी वर्दी ही सन्मानाची आणि जनतेच्या रक्षणासाठी असलेली वर्दी घालून अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करत असतात मात्र काही खाजगी लोक चुकीच्या लोकांच्या संगतीने पोलीस खात्यात चब ढब करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असल्याचे चित्र आहे. मुळे आणि सुपारी बहाद्दर बिंगो किंग यांच्यामुळे चांगले कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत





