Homeक्राईमअर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण.. एक एप्रिल महत्त्वाची तारीख .. संचालक कर्जदार...

अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण.. एक एप्रिल महत्त्वाची तारीख .. संचालक कर्जदार आणि ज्यांचा आतापर्यंत काही सहभाग दिसत नव्हता त्यांनीही अटकपूर्व जामीन ठेवल्याने घोटाळ्यातील सस्पेन्स वाढला…. आरोपींची यादी लीक कोणी केली…

advertisement

अहमदनगर दि.31 मार्च
अर्बन बँक बोगस कर्ज प्रकरण घोटाळ्यात दिवसेन दिवस नवीन माहिती समोर येत आहे.शेकडो आरोपी असलेला हा घोटाळ्याने 109 वर्ष जुनी बँक बंद पडली आहे यामुळे बँकेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत तर कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.


या कर्ज घोटाळ्या प्रकरणी राजेंद्र गांधी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतरच खऱ्या अर्थाने कर्ज घोटाळा समोर आला या घोटाळ्यात अनेक संचालक बँकेचे अधिकारी अडकले आहेत. या प्रकरणात शंभर पेक्षा जास्त आरोपींची संख्या असून अनेक बोगस कर्जदार सामील आहेत.ज्या व्यक्तीची कुवत हजार रुपये भरण्याची नाही त्या व्यक्तीच्या नावावर कोटी कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहेत विशेष म्हणजे कर्ज दिल्या नंतर कर्जातील काही रक्कम संचालकांच्या खात्यावर जमा झाली आहे. या प्रकरणात पकडलेले कर्जदार आता खऱ्या कहाण्या सांगू लागले असून हा घोटाळा ठरवून झाल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखे कडे असून अधिकाऱ्यांच्या बदली मुळे तपास काहीसा संथ गतीने पुढे जात आहे.मात्र काही संचालकांच्या अटके मुळे काही संचालक पळून गेले आहेत.
सध्या जे संचालक अटकेत आहेत आणि जे पळून गेले आहेत असे संचालक आणि बँकेचे अधिकारी आता पोलिसांकडून अटक होऊ नये म्हणून अटक पूर्व जामीन अर्ज ठेवत असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे कर्जदार नसताना आणि संचालक नसताना अटक पूर्व अर्ज ठेवणारे बरीच लोकं या मध्ये सामील असल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या अटक पूर्व जामीन अर्जवरून लक्षात येऊ लागले आहे.
संगमनेर येथील अमित पंडित हा सध्या अटकेत आहे त्याने न्यायालयात जामीन अर्ज ठेवला असून 2 एप्रिल रोजी त्यावर युक्तिवाद होणार आहे.
तर राजेंद्र लूनिया कर्जदार प्रवीण लहारे कर्जदार अविनाश वैकर , यांच्या जामीन अर्जावर 1 एप्रिल रोजी युक्तिवाद होणार आहे तर संचालक कमलेश गांधी याने अटक पूर्व जामीन ठेवला असून निवृत्त वरिष्ठ अधिकारी एम पी साळवे ,नवीन गांधी,सतिश शिंगटे,सतिष रोकडे यांच्या अटकपूर्व जामीनावर एक एप्रिल रोजी युक्तिवाद होणार आहे.

पुणे येथील कर्जदार चव्हाण कुटुंबातील यद्नेश बबन चव्हाण अटकपुर्व जामीन पोलीसांचे म्हणने हा आरोपी चिंचवड 22 कोटी फसवणुकीतील मुख्य कर्जदार बबन चव्हाण व वंदना चव्हाण यांचा मुलगा आहे या चव्हाण कुटुंबियाचे इतर कोणते कनेक्शन सापडले हे पाहणे नक्कीच महत्वपूर्ण राहणार आहे

सर्वात मुख्य आणि महत्वाचे म्हणजे देवेंद्र दिलीप गांधी अटकपुर्व जामीन अर्ज ठेवला आहे यांच्या बाबत पोलीस न्यायालयात काय म्हणणे सादर करतात हे महत्व पूर्ण ठरणार आहे.तसेच. प्रगती देवेंद्र गांधी यांच्या अटक पूर्व जमिनीवर 1 एप्रिल रोजी युक्तिवाद होणार आहे.

यामध्ये देवेंद्र दिलीप गांधी प्रगति देवेंद्र गांधी
कमलेश गांधी आणि यद्नेश चव्हाण यांचे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल होणे हे आश्चर्यजनक आहे कारण आरोपींची यादी ही गोपनीय होती तरी देखील या व्यक्तिना ते आरोपी आहेत हे कळले हे बाब खुप गंभीर आहे व पोलीसांचे भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका ठेवल्यानंतरच पोलिसांनी आरोपी केले आहेत मग या आरोपींना आपण आरोपी आहोत हे कळले कसे हा प्रश्न निश्चितच गंभीर आहे.
अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींची धरपकड आणि न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यासाठी अर्बन बँक बचाव समिती सातत्याने पाठपुरावा करत आहेत अनेक ठेवीदार बँक घोटाळ्यातील आरोपींच्या न्यायालयीन सुनावणीसाठी हजर असतात.

तर यामधील अजून काही बडे मासे बाहेरच फिरत आहेत अनेक स्थावर मालमत्ता अशा आहेत की ज्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे.मात्र आज त्या विकण्यास गेल्यास लाख रुपये सुद्धा बँकेला मिळू शकत नाही त्यामुळे दिवसेनदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना ठेवीदारांना पैसे कसे मिळतील यासाठी बँक अवसायकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बँकेतील तत्कालीन संचालकांच्या मालमत्तेची जप्ती करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे देता येऊ शकतात यासाठी एम पी ए डी कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular