अहमदनगर दि.४ मार्च
लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे त्याच बरोबर आयपीएल सामने ही सध्या चांगलेच रंगात आले आहेत. या आयपीएल सामन्यांबरोबर नेहमीप्रमाणे सट्टेबाजी ही जोमात सुरू आहे मात्र सध्या निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांकडे सट्टेबाजी रोखण्याकडे मनुष्यबळ नसल्याने सट्टेबाज चांगलीच बॅटिंग करत आहे.
सट्टेबाजी मध्ये दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञ वापरून आधुनिक पद्धतीने सट्टेबाजी होत चाललेली आहे. आधुनिक पद्धतीने चाललेल्या या सट्टेबाजीत आता ठराविक “आयडी” दिला जातो आणि या ठराविक आयडीवरूनच सट्टेबाजीचा व्यवहार सुरू असतो. काही ठराविक बुकी हा ॲप म्हणजेच “आयडी”तयार करून जे सट्टेबाजी खेळणारे ग्राहक आहेत त्यांना देत असतात. मात्र यामध्ये धक्कादायक माहिती अशी आहे की हा “आयडी” जो बुकी असतो तोच ऑपरेट करत असतो त्यामुळे समोरच्या खेळणाऱ्या व्यक्तीला किती रुपयांपर्यंत हरवायचे आणि किती रुपयांपर्यंत जिंकवायचे हे सर्व त्या बुकिंग च्या हातात असते. त्यामुळे या खेळात खेळणारे कधीच जिंकत नाही तर खेळवणारे मात्र गब्बर होत चालले आहेत.
दोन नंबर धंद्यात कधीच बेईमानी होत नाही असं नेहमी बोलले जातं मात्र ही फसवेगेरी आणि बेइमानी खुलेआम सुरू आहे.
पोलीस प्रशासन दरवर्षी या सट्टेबाजी करणाऱ्या गब्बर बुकिंवर कारवाई करत असतात मात्र यावर्षी अद्यापही एकही कारवाई झाल्याचं निदर्शनात येत नाही कारण आधुनिक पद्धतीने सुरू असलेली सट्टेबाजी आणि त्यातून मिळणारा बक्कळ पैसा आणि यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल यामुळे सध्या तुम्ही चूप हो हम भी चुप रहो अशी परिस्थिती सुरू आहे. मात्र यामुळे एक मोठा वर्ग कर्जदार होत चालला आहे आणि यातूनच गुन्हेगारी वाढू शकते बेरोजगार तरुण कमी श्रमात जास्त पैसा कमावण्याच्या नादात या सट्टेबाजीच्या नादी लागून आहे तो पैसा घालून पुन्हा कर्जबाजारी होतात आणि ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. त्यामुळे एक ठराविक वर्ग गब्बर होत चालला आहे तर एक ठराविक वर्ग कर्जबाजारी होत चालला आहे. याला रोखण्याचा मोठा आवाहन पोलीस आणि पालकांच्या हाती आहे.
सट्टेबाजी करणारे मोठे बुकी हे सट्टेबाजी साठी लागणारे आयडी स्वतः बनवत असतात आणि सर्व व्यवहारांवर त्यांचं लक्ष असतं त्यामुळे पैसा बाहेर कधीच जात नाही. मोबाईल मध्ये रिचार्ज करतात त्या प्रमाणे पैसे भरा आणि जुगारखेळा अशी परिस्थिती असते त्यामुळे कुणी किती पैसे भरले याची सर्व माहिती बुकिंकडे असल्यामुळे आणि त्यांच्या हातातच सर्व कंट्रोल असल्यामुळे हा सर्व पैसा बुकिंच्या घशात जात आहे आणि खेळणारा नेहमीच कर्जबाजारी होतानाचे चित्र सध्या नगर शहरात दिसून आहे.
त्यामुळे तरुण मुलांच्या मोबाईल मध्ये हा ॲप पाठवा आयडी आहे का हे तपासणीही कारणे पालकांचे कर्तव्य आहे आपला मुलगा या मोहजाळात अडकला तर नाही ना यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या मोबाईल मध्ये एकदा तरी डोकवणे गरजेचे आहे सुरुवातीला गंमत म्हणून सुरू होणारा खेळ हा पुढे जीवावर बेतू शकतो.