अहमदनगर दिनांक 30 मार्च
अहमदनगर शहरात बंदुकीच्या शेकडो गोळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळ्या नगर शहरातील अहमदनगर पुणे संभाजीनगर महामार्गावर असलेल्या कोठी परिसरात सापडल्या आहेत.
या प्रकाराची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस आता या गोळ्या जप्त करून या गोळ्या नेमक्या कुठून या ठिकाणी आल्या आहेत आणि कोणी आणल्या आहेत याचा तपास करणार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळ्या पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.