अहिल्यानगर, दि. 20
नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज येथील जिल्हा न्यायाधीश एम. एच. शेख यांनी आज फेटाळून लावला.
नगर अर्बन बँकेत मोठा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी आजी-माजी संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही माजी संचालकांना अटकही झाली आहे, तर काही संचालक फरार आहेत. यातील काही जणांनी अटकपूर्व जामण्यासाठी अर्ज केलेला आहे तर काहींना जामीन सुद्धा मिळालेला आहे. साधारणता 291 कोटी रुपयांचा हा घोटाळा झाला असून या संदर्भामध्ये तीन ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
यासंदर्भात आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
मूळ फिर्यादी व ठेवीदार यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. बँकेच्या घोटाळे संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी बँकेला लेखी पत्राद्वारे आदेश दिलेले असताना त्याचे पालन झालेले नाही. रिझर्व्ह बँकेने त्यावेळी ४० लाखांचा दंडही केला होता. बँकेच्या ऑडिटमध्ये अनेक बाबी उघड झालेल्या होत्या. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे, ही बाब त्यांनी युक्तिवादामध्ये दाखवून दिली.
मर्दा यांनी जे काही अहवाल बँकेमध्ये सादर केले ते खोटे असून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हा उद्योग केलेला आहे ही बाब बँकेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे दोन कंपन्यांमध्ये यांची भागीदारी आहे कोट्यावधी रुपयांची उलाढाल या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे मर्दा यांना नेमके किती रुपये मिळाले हे सुद्धा आता पहावे लागणार आहे व त्याचा तपास करावा लागणार आहे असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला व्यंकटेश डेव्हलपर्स व सम्ययक ट्रेडर्स या दोन ठिकाणी मर्दा यांची भागीदारी आहे ,हे पुरावांशी सिद्ध झाले आहे. त्यांनी अशाच पद्धतीने खोटे कागदपत्र तयार करून दिल्यामुळे मोठा घोटाळा झालेला आहे. यामध्ये अनेक जण भागीदार आहेत, त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा असा युक्तिवाद पुप्पाल यांनी यावेळी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मर्दा यांच्या अटीपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे