अहिल्या नगर दिनांक 1 फेब्रुवारी
नगर अर्बन को ऑपरेटिव्ह मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता सेवा समाप्तीच्या नोटीसा बँकेच्या वतीने देण्यात आल्या असून तीन मार्च 2025 पासून कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात येणार असल्याचे पत्र सध्याचे बँक आवसायकांच्या सहीने देण्यात आले आहे.
या पत्रात कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की दिनांक चार सप्टेंबर 2023 रोजीच्या सूचनेस अनुसरून कळवण्यात येते की आपली बैंक बहुराज्यीय सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत असून, ती सहकारी सात्याच्या अधिपत्या खाली असून, बँकेचा व्यवसाय रिझर्व बैंक ऑफ इंडियाच्या पेक्षा बँकेची एकूण देणी अधिक झाल्याने बँकेच्या व्यवहार करण्याचा परवाना रिझर्व बँकेने दि. ०४/१०/२०२३ रोजीच्या आदेशाद्वारे रद्द केला होता तसेच सहकार खात्याचे निबंधकानी दि.०८/१०/२०२३ रोजीच्या आदेशाने बँकचे सर्व व्यवहाराची समाप्ती करून देणे करण्याची देणी देण्याकरिता अवसायक म्हणून गणेश अशोक गायकवाड, यांची नेमणूक करून बँक (अवसायन) लिकिडेशन प्रक्रिया सुरु केली आहे. बँकचा व्यवसायच बंद झाल्याने व बँक अवसायनात गेल्यामुळे बँकेच्या अस्तित्वाचे संपूर्ण समाप्ती पर्यंत कमीत कमी खर्चात येणी वसूल करून, ग्राहकाची व इतर देणी देण्याचे कामच शिल्लक राहिले आहे ते करावे लागणार असल्याने , लिक्रिडेशन (अवसायन) प्रक्रिया चालू झाल्याने कामगार कर्मचाऱ्याची / अधिकारी सेवा समाप्त करून खर्च वाचविण्याशिवाय पर्यायच अवसापकाकडे शिल्लक नाही त्यामुळे दि ०३/०३/२०२५ रोजीच्या ऑफिस कामाचे तासानंतर तुमची सेवा संपुष्टात येईल. असे पत्र कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.