अहमदनगर दि.१२ जानेवारी
नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अर्बन बँकेचे शाखा अधिकारी असलेले लुनिया आणि पाटील या दोघांना अटक केली होती त्यानंतर आता यांच्यापेक्षाही उच्च अधिकारी असलेले दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची खात्रीशीर माहिती समजतेय.
या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या का उच्च अधिकार्यावर तत्कालीन अध्यक्षांनी पिंपरी चिंचवड येथील कर्ज घोटाळ्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण केला असल्याचा लेखी आरोपही केला होता. मात्र त्यानंतर आरोप होऊनही बँकेने कोणतीच कारवाई केली नव्हती.हे प्रकरण अखेर तेरी भी चूप मेरी भी चूप याप्रकारे मिटवले गेले असल्याची चर्चा बँकेत सुरू होती.
आर्थिक गुन्हे शाखेने आता ज्या दोन लोकांना ताब्यात घेतले आहे त्या दोन लोकांचा सहभाग कर्ज घोटाळ्यात निर्णायक असल्यामुळे या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार कसा केला गेला आणि कोणी करायला लावला याची सविस्तर माहिती भेटू शकते. त्यामुळे आता नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील एक एक कडी जुळू लागली असून ही शेवटची कडी संचालकांपर्यंत कधी जातेय याकडे आता लक्ष ठेवावे लागेल..