अहमदनगर दि.२३ फेब्रुवारी – अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक च्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे DYSP संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रविण सुरेश लहारे याला अटक केल्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी यातील मुख्य आरोपी सीए विजय मर्दा ची लूक आउट प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन गृह मंत्रालय भारत सरकार दिल्ली येथे पाठवला होता त्याला आज मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे आता भारतातील सर्व विमानतळ व समुद्री मार्गेचे बंदर येथे त्याची लुक आउट नोटीस जारी करून त्याचा इतरत्र शोध घेतला जात आहे.