HomeUncategorizedज्या शहरावर राजकारणातून राज्य केले..ज्या बँकेत चेअरमनपद भूषविले त्याचा बँके समोर दिगवंत...

ज्या शहरावर राजकारणातून राज्य केले..ज्या बँकेत चेअरमनपद भूषविले त्याचा बँके समोर दिगवंत नेत्याच्या फोटला संतप्त ठेवीदारांना मारल्या चपला..

advertisement

अहमदनगर दि.१८ डिसेंबर

अहमदनगर शहरातील 113 वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेल्या नगर अर्बन बँकेवर रिझर्व बँकेने कारवाई करून लायसन रद्द केल्यामुळे बँक बंद झाली आहे ही बँक बंद झाल्यामुळे अनेक ठेविदार आणि खतेदारांचे पैसे या बँकेत गुंतले आहेत. संचालक मंडळांनी बेकायदेशीर कर्ज मंजूर करून करोडो रुपयांचा कर्ज घोटाळा केल्यामुळे बँक डबघाईला आली होती आणि यामुळेच रिझर्व बँकेने कारवाई केली असल्याने अनेकांच्या ठेवी आणि पैसे बँकेत गुतले आहेत या ठेवी मिळत नसल्याने गोरगरीब ठेविदार हातबल झाले आहेत.

काही ठेवीदारांनी आज बँकेत येऊन बँकेचे माजी चेअरमन त्यांच्यामुळे घोटाळा झाले आहे असे अहमदनगर जिल्ह्याचे भाजपचे दक्षिणेचे माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांचा फोटो काढून तो फोटो बँकेबाहेर ठेवून चपलांनी या फोटोला मारत निषेध केला आहे.

लाखो लोकांच्या ठेवी या माजी चेअरमनने केलेल्या कर्ज घोटाळ्यामुळे बँकेत पैसे अडकून पडल्या असल्याचा आरोप यावेळी ठेवीदारांनी करत फोटोला जोडे मारले तर काहींनी अक्षरशा फोटो तोडून टाकला आहे. ज्या बँकेत आणि ज्या बँकेवर चेअरमन म्हणून आणि शहरावर खासदार म्हणून एकेकाळी वर्चस्व गाजवले होते त्याच खासदारांच्या फोटोला आज ठेवीदारांनी त्याच बँकेसमोर जोडे मारो आंदोलन केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular