Home राज्य महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ?

अहमदनगर दि.२५ जुलै (सु थो )

सर्वांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे लोकसभा निवडणूक नंतर अनेक इच्छुक उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सध्यातरी जागा वाटप होण्याआधी अनेक भावी आमदार म्हणून मिरवत आहेत. मात्र त्यांचं खरं भविष्य निवडणुकीनंतरच समजणार आहे.

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिले आहे. विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळव करून उमेदवारी पदरात पाडण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची या अचानक झालेल्या घोषणेणे चांगलीच झोप उडाली आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणुक
एकाच दिवशी होणार आहे. २० सप्टेंबर रोजी
निवडणूकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार असून. निवडणूक नामनिर्देशन अर्ज २७ सप्टेंबर पासून भरण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे.तर मतदान १५ ऑक्टोबर रोजी होईल अशी शक्यता आहे. मतमोजणी १९ ऑक्टोबर रोजी होईल आणि २१ ऑक्टोबर पर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येऊ शकते.

मागील निवडणूक ही २१ ऑक्टोबर २०१९ रोजी
घेण्यात आलेली होती. कदाचित निवडणूक आयोग लोकसभेप्रमाणे या जाहीर केलेल्या तारखामधे काही दिवसाचा फेरबदलही करु शकतो. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना मात्र आता
तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निवडणूकीतील राजकीय पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांना चांगलीच दमछाक करावी लागणार आहे. जिल्ह्यातील
काही नेते राजकीय पक्षाने तिकिट नाकारल्यास एकला चलोरे करत अपक्ष उमेदवारी करण्यासाठी रणनीतीची आखणी करीत आहेत.

मात्र आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटप होऊन कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण लोकसभेनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारणात उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्याने महाविकास आघाडीत अनेक उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर महायुतीतही अनेक उमेदवार निवडणुकीचे बाशिंग बांधून तयार आहेत मात्र आता कोणाच्या डोक्यावर उमेदवारीची अक्षदा पडते हे येणाऱ्या काळात समजेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version