Home राजकारण विक्रम राठोड यांची उमेदवारीची पोस्ट…मात्र अनेक प्रश्न..आणि संभ्रम…

विक्रम राठोड यांची उमेदवारीची पोस्ट…मात्र अनेक प्रश्न..आणि संभ्रम…

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 28 डिसेंबर

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून दोन दिवसानंतर पक्षांचे तिकिटे कोणाला मिळणार हे कळणार असले तरी अद्याप अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करणे टाळले आहे. त्यामुळे होणारी बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले असले तरी अनेकांनी तिकीट मिळाले नाही तरी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर बंडखोरी थंड करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मोठा त्रास होणार आहे.

Oplus_131072

अहिल्या नगर शहरात 2014 पर्यंत पंचवीस वर्ष शिवसेनेची एक हाती सत्ता होती ती आमदारकी असो वा महानगरपालिका असो शिवसेना म्हणजे नगरकर आणि नगरकर मध्ये शिवसेना असे एक गणित झाले होते. स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांनी प्रत्येक निवडणुकीत भगवा झेंडा महानगरपालिकेवर फडकावला होता. मात्र आता त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी तेजस्विनी ताई विक्रम राठोड यांना प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करणार असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. मात्र या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ना त्यांनी पक्षाचा उल्लेख केला आहे. ना कोणत्याही चिन्हाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अनेकांना याबाबत संभ्रम निर्माण झाला असून अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version