Homeजिल्हाविसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश... खासदार डाॅ....

विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… खासदार डाॅ. सुजय विखे यांची माहिती पालकमंत्री विखे पाटील व आमदार पाचपुते यांची शिष्टाई आली कामी

advertisement

श्रीगोंदा दि .१६ जानेवारी
कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी पुण्यनगरीशी बोलताना देत याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर धरणार पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिल्याने ना.विखे आणि आ.पाचपुते यांची शिष्टाई कामी आल्याची माहिती दिली.

डाॅ. विखे यांनी बोलताना विसापुरच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी आहे. पाणी सोडण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते हे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या वेळोवेळी संपर्कात होते. विसापूर धरणात पाणी सोडण्याबाबत दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार उपमुखमंत्री पवार यांनी येत्या २१ जानेवारीपासून कुकडीच्या सुरु असणाऱ्या आवर्तनातून विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले. २१ ते २३ जानेवारी दरम्यान ३०० दशलक्षघनफूट पाणी विसापुरमध्ये सोडण्यात येणार असून त्यानंतर ते लाभधारकांना आवर्तनाद्वारे देण्यात येईल. त्यामुळे त्याभागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी , शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular