अहमदनगर दि.८ मे
माहेरवरून ५० लाख व्यवसायासाठी घेऊन यावेत या साठी छळ करणाऱ्या सासरच्या सात लोकांविरुद्ध पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पिडीत महिलेचा विवाह ४ जुलै २००६ मध्ये विवाह झाल्या नंतर काही दिवसातच तिच्या सासर कडील मंडळींनी व्यवसाया साठी पैसे आणावेत असे वारंवार सांगत असत. पैसे मिळाले नाहीत हे पाहून पिडितेचा छळ करण्यात आला. त्या नंतर पीडितेने भरोसा सेल येथे तक्रार केली होती मात्र या ठिकाणीही समेट न झाल्याने अखेर भोरोस सेलने हे प्रकरण तोफखाना पोलिसांकडे पाठवले आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती अजय अशोक मुथीयान, सासु अलका अशोक मुथीयान (रा. कराचीवालानगर, अहमदनगर), नंनद शितल दीपक कुंकुलोळ (रा. कळंब जि. उस्मानाबाद), चुलत सासरे संपत रोकडचंद मुथीयान, चुलत दीर अतुल संपत मुथीयान, चुलत दीर राहुल संपत मुथीयान (रा. टिळक रोड, अहमदनगर) व एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे.