Home शहर बोटावर मोजण्या इतक्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चालतोय चार लाख लोकसंखेच्या मनपाच्या पाणी...

बोटावर मोजण्या इतक्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चालतोय चार लाख लोकसंखेच्या मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा कारभार

अहमदनगर दि.२२ एप्रिल

अहमदनगर शहराची लोकसंख्या जवळपास चार लाखाच्या पुढे गेली आहे मात्र या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागा मध्ये तेवढे कर्मचारी नसल्याने सध्या नगर शहरामध्ये पाण्याचा विस्कळीतपणा आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे जरी विस्कळीतपणा असला तरी यामध्ये राजकारण आणि पाण्याची पळवापळवी हेही पाणी विस्कळीत होण्याचं मुख्य कारण आहे.महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सध्या दोन इंजिनिअर ,चाळीस व्हॅलंमन, दोन फिटर ,यांच्यावर सध्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग सुरू आहे.

चार लाखांच्या पुढे गेलेल्या लोकसंख्येला फक्त बोटावर मोजण्याइतकेच लोक काम करत असल्याने पाण्याचा विस्कळीतपणा होणार हे नक्की आहे. नगरपालिकेतुन महानगरपालिका होत असताना पाणीपुरवठा विभागा मध्ये सुमारे दीडशे कर्मचारी कार्यरत होते मात्र त्यापैकी आता जवळपास शंभर कर्मचारी सेवानिवृत्त झाले झाले असल्याने काही कामगारांना मानधनावर घेतले जाते मात्र त्यांचे मानधन वेळेवर भेटत नसल्याने मानधनावर येण्यासाठी कुणी तयार होत नाही.

तीन तीन महिने मानधन न भेटल्याने अनेक वेळा अधिकाऱ्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कुठे पाईपलाईन लिकेज झाले तर अधिकाऱ्यांना खाजगी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातपाय पडून काम करून घ्यावे लागते त्यांचे बिल वेळेवर भेटत नसल्याने पुढचे काम करण्यास खाजगी लोक तयार होत नाहीत ही मनपाची परिस्थिती आहे.

महानगरपालिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून पाणी पुरवठा विभाग समजला जातो मात्र याच विभागाला कमी कामगार आणि अधिकारी असल्यामुळे एकाच अधिकाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण पडत असल्यामुळे काम विस्कळीत तर होतेच मात्र यातून नागरीक आणि कर्मचाऱ्यांचे वादाचे अनेक प्रसंग घडत असतात.

त्याचप्रमाणे मुळा डाँम वसंत टेकडी कडे येणाऱ्या मुख्य पाइपलाइनवर अनेक ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागासाठी पाण्याच्या जोडण्या घेतल्याने त्याचा परिणाम वसंत टेकडी येथील पाणी भरण्यावर होतो तसेच शहरातील कोणत्या टाकी कधी भरायची यावरही राजकारण होत असल्यामुळे काही ठराविक भागांना भरपूर पाणी जाते तर काही भागांना काही मिनिट पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सर्व समान पद्धतीने पाणी वाटप सुरू असताना काही पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ठराविक भागात जास्त पाणी जात असल्याचं निदर्शनास येत आहे. तर काही भागांना अगदी काही मिनिटांसाठी पाणी येतंय की सध्याची नगर मधील वस्तुस्थिती आहे. लाखो करोडो रुपये खर्च करून अमृत योजना आणि फेज टू चे काम सुरू असतानाही पाण्याचा विस्कळीतपणा हा काही राजकारणामुळे होत असल्याचं समोर येतेय.पाणी वाटप करताना भेदभाव आणि राजकारण झाले नाही तर सर्वाना पाणी भेटू शकते मात्र इथे असं झालंय की ज्याच्या हातात चावी तोच जास्त अट्या फिरवणार !

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version