Home शहर वाहन तपासणी करत असताना एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली धडक नगर शहरातील...

वाहन तपासणी करत असताना एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली धडक नगर शहरातील या कार्यालयात घडला प्रकार

अहमदनगर दि.२२ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती हाती येत असून एका वाहनाची तपासणी करत असताना एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला धडक देऊन उडवले असल्याची माहिती हाती येत आहे. आज सकाळी ही घटना अहमदनगर शहरातील सोलापूर रोडवरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात घडली आहे.


याच आवारात दोन दिवसांपूर्वी एका महिला अधिकारी वाहन तपासणी करत असताना वाहन रोडच्या शेजारील खड्ड्यात गेल्याने अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येत असून या दोन्ही जखमी अधिकाऱ्यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका मागे एक दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत मात्र याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती.

या प्रकरणाबाबत सायंकाळपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता मात्र जो अधिकारी जखमी झाला आहे त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती असून विशेष म्हणजे त्या अधिकाऱ्याची तेथे ड्युटी नसताना तो अधिकारी तिथे पोहोचला कसा हा प्रश्न समोर उभा राहत आहे. तसेच ज्या गाडीने अपघात केला ती गाडी तातडीने कार्यालयाच्या बाहेर काढून देण्यात आली.

वाचत रहा पुढील भागात तो खाजगी इसम आरटीओ अधिकाऱ्यांबरोबर कसा?

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version