अहमदनगर दि.२३ मे
२३ मे १९०४ रोजी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे
पहिले जागतिक ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जगातील १३० पेक्षा जादा देश कुस्ती खेळतात, त्याचबरोबर कुस्ती बघण्यासाठी नेहमीच प्रेक्षक गर्दी करत असतात.
कुस्ती या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्रानेच सर्वात मोठे महत्त्व दिले आहे. तसा हा पारंपरिक खेळ आहे. छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिला आणि पश्चिम महाराष्ट्रात खास करून कोल्हापूर जिल्ह्यात कुस्तीचे आजही महत्त्व आहे. खासबागच्या मैदानावर आजही हजारो लोक कुस्तीच्या दंगलीला गर्दी करतात. अजूनही ग्रामीण भागात, खेड्यापाड्यातसुद्धा तालमी आहेतच. लाल आखाड्यात माती आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हय़ांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरत आहेत. त्यातूनच महाराष्ट्र केसरी तयार होतात. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले, पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील एकाही मल्लाला त्यांच्याएवढी उंची गाठता आली नाही.
त्याचबरोबर अहमदनगर शहरातील कै.पै.छबुराव लांडगे रानबोके यांनी त्या काळातही कुस्तीमध्ये मोठे नाव कमावले होते दख्खन का काला चिता म्हणून कै.पै.छबूराव लांडगे यांची कुस्ती क्षेत्रात मोठी ओळख होती. त्यांनी महाराष्ट्र सह देशभर अनेक कुस्तीचे मैदानी गाजवली. कुस्तीच्या जोरावर अहमदनगर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचं काम कै.पै.छबूराव लांडगे यांनी त्यावेळी केले. त्यानंतर त्यांचे नातू पै वैभव लांडगे यांनी त्यांच्या आजोबांची धुरा सांभाळत अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कुस्तीला सुवर्ण वैभव प्राप्त करून देण्याचे काम केले आहे.
अहमदनगर शहरात महाराष्ट्र केसरी सारख्या आणि इतर मोठमोठ्या कुस्त्यांचे जंगी मैदान भरवून कुस्तीला सोन्याचे दिवस आणून देऊन मल्लांना कुस्ती स्पर्धेत टिकवण्याचं काम वैभव लांडगे यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेमध्ये भारतामध्ये प्रथमच सोन्याची गदा बक्षीस म्हणून देऊन कुस्तीच्या इतिहासात अहमदनगरचे नाव कोरण्याच काम ही पै.वैभव लांडगे यांनी केल आहे.
सतत अहोरात्र कुस्तीसाठी काहीतरी करायला हवं याचा ध्यास घेऊन दरवर्षी अहमदनगर शहरात वेगवेगळ्या पद्धतीच्या कुस्ती स्पर्धा घेण्याचे काम पै. वैभव लांडगे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत .कुस्तीला सुवर्ण वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर कुस्ती स्पर्धेमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे तालमीमध्ये मेहनत घेणारे मल्ल यांच्या कष्टाला फळ मिळत असते त्यामुळेच वैभव लांडगे नेहमीच कुस्ती स्पर्धा भरवतात
ज्या प्रमाणे क्रिकेटमध्ये खेळाडूंना विकत घेण्याची बोली लावली जाते त्याचप्रमाणे कुस्ती स्पर्धेतही लीग भरून वैभव लांडगे यांनी एक वेगळा इतिहास रचला आहे कुस्ती स्पर्धेलाही एक कॉर्पोरेट लूक देण्याचं काम त्यांनी केले. कुस्ती मातीवरची असो की मॅटवरची असो पै. वैभव लांडगे आणि कुस्ती हे एक समीकरण झाले आहे. अहमदनगर शहरात कुस्तीला वैभव प्राप्त करून देणारे वैभव लांडगेच आहेत.