अहमदनगर दि.२३ मे
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अहमदनगर शहरातील डॉक्टर शुभांगी पोटे केकान यांनी यूपीएससी स्पर्धेत पाचशे तीस क्रमांक मिळवून परीक्षेत यश मिळवले आहे. डॉक्टर शुभांगी पोटे यांनी कोणत्याही क्लासची अथवा स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या अकॅडमीची मदत न घेता सेल्फ स्टडीवर भर देत सासू-सासरे घर प्रपंच आणि सहा वर्षाच्या मुलाला सांभाळत या परीक्षेत यश मिळवले आहे.
मनात फक्त जिद्द ठेवली होती आणि सासूने दिलेला कानमंत्र तो म्हणजे मी माझ्या काळात शिकले नाही मात्र तू शिकून पुढे जा हा मंत्र मनात ठेवून अभ्यास करत राहिले आणि लहान मुलाला सांभाळण्याची पतीने जबाबदारी घेतल्यामुळे आणि प्रोत्साहन दिल्यामुळे हे यश प्राप्त झाल्याची भावना डॉक्टर शुभांगी पोटे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.या यशाबद्दल डॉक्टर शुभांगी पोटे केकान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.